विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर
By निलेश जोशी | Updated: October 12, 2023 21:07 IST2023-10-12T21:07:12+5:302023-10-12T21:07:23+5:30
विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धे १९ वर्षाखालील वयोगटात बुलढाण्याच्या मुला व मुलींच्या फुटबॉल संघांनी अनुक्रमे अमरावती व यवतमाळ संघाचा पराभव केला.

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर
बुलढाणा : शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वर्धक ठरलेल्या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धे १९ वर्षाखालील वयोगटात बुलढाण्याच्या मुला व मुलींच्या फुटबॉल संघांनी अनुक्रमे अमरावती व यवतमाळ संघाचा पराभव केला. आता कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दे दोन्ही संघ अमरावती विभागाचे प्रतिनिधीत्व करतील. विशेष म्हणजे दोन्ही सामन्याचा निकाल हा पेनल्टी शुट आऊटवर निश्चित झाला.स्थानिक सहकार विद्यामंदिराच्या मैदानावर १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या १९ वर्षाखालील मुला, मुलींच्या विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेस काळी प्रारंभ झाला होता. या स्पर्धेत अमरावती येथील व्हीबीएम शाळेचा संघ सेमी फायनलमध्ये एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये आला होता. बुलढाण्याच्या उर्दू हायस्कूलच्या तगड्या संघाचे त्यांच्या समोर आव्हान होते. दरम्यान अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी लौकिकास साजेसा खेळ केला. चेंडूवरील नियंत्रण आणि तंदुरुस्ती तथा अपवाद वगळता थेट पास देण्याचे कस या दोन्ही संघाची गुणवत्ता स्पष्ट करत होते. पहिल्या व दुसऱ्या हॉपमध्ये दोन्ही संघ एकही गोल करू शखले नाही. अमरावतीच्या अरबाज आणि आयुष यांनी दोन नामी संधी हुकवल्या. अन्यथा या स्पर्धेचे चित्र वेगळे दिसले असते. सेंटर फॉरवर्डवर खेळणाऱ्या समीरनेही आक्रमक खेळ केला. बुलढाण्याच्या अहेफाजसह अन्य खेळाडूंनीही चांगला खेळ केला परंतू गोल करण्याच्या तीन संधी त्यांनी हाताने दवडवल्या. शेवटी पेनल्टी शुआऊटवर या सामन्याचा निकाल बुलढाण्याच्या पारड्यात ४ विरुद्ध ३ असा पडला.
दबावाचा अमरावतीला फटका
अमरावतीच्या संघाने पेनल्टी शुआऊटचा काहीसा दबाव घेतला होता. कैफ व आयुष यांनी अनुक्रमे तिसरा व पाचव्या शुटदरम्यान उंचावरून गोल करण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला. असाच प्रयत्न बुलढाण्याच्या अहेफाजने केला. परंतू नंतर बुलढाण्याच्या अन्य दोन खेळाडूंनी परिस्थितीचे गांभिर्य बघत सावधपूर्ण पेनल्टी घेत गोल केल्याने बुलढाण्याचा विजय साकारला.
मुलींमध्ये राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा विजय
मुलींच्या सामन्यात चांधई येथील राजमाता जिजाऊ मुलींच्या सैनिकी शाळेच्या मुलींनी यवतमाळ येथील पोदार स्कूलचा ४ विरुद्ध १ अशा गोल फरकाने पराभव केला. या सामान्यात सैनिकी शाळेच्या मुलींनी चांगला खेळ केला. समिक्षा तायडे, गायत्री, सलोनी राठाडे यांना गोल करण्याच्या नामी संधी मिळाल्या होत्या. मात्र त्यांचे गोल पोस्टजवळील फिनिशींग फारसे चांगले होत नव्हेत. त्यातून हा सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. पेन्लटी शुटआऊटमध्ये मग या संघाने बाजी मारली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी यांनी घेतला पुढाकार
या स्पर्धेच्य यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, मुकेश बाफणा, सेवानिवृत्त फुटबॉल कोच हरिहर मिश्रा यांच्या मार्गदर्शनात रमीज फवाद, राहूल अवलसा, माजीद निसार, सय्यद शेख अहेमद सुलेमान उर्फ बब्बु भाई, सय्यद दाऊद, सहकार विद्यामंदीरचे फुटबॉल संघाचे प्रशिक्षक जावेद खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.