शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

अध्यक्षपदाची लालसा नाही; राजीनामा देणारच -  बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 18:23 IST

लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला. 

मलकापूर : जिल्हा परिषदेत काम करताना विरोधकांचा विरोध स्वाभाविक आहे. मात्र सत्तेच सोबत असतांना बंडखोरीतून जिल्हाध्यक्ष बनलेल्या ध्रुपदराव सावळे यांच्यासारख्या नेत्यांचं ऐकून स्वकीय व लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा  इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला. मुख्यमंत्री रविवारी जिल्ह्यात आहेत. त्या धरतीवर उमा तायडे यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधताना संबंधित इशारा दिला. सभागृहात सदस्यांची भूमिका हास्यास्पद होती. विषय काय कुणी समजूनच घेतला नाही. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्या धरतीवर पाणी पुरवठा योजनावर संपूर्ण जिल्ह्यातील लोणारपासून संग्रामपूरपर्यंत विषय होते. त्या विषयावर ठराव घेवून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपाययोजना हा उद्देश होता. जिल्ह्यातील आरोग्य विभागात ७० लाख रूपये पडून आहेत. हा निधी व्यपगत न होवू देता, खचार्साठी शासनाची मुदतवाढ मिळावी हा विषय होता. याखेरीज अनेक विकासकामांचे विषय होते. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा विषय असतांना त्याला विरोध हास्यास्पद नाही तर काय, असा प्रतिप्रश्न उमा तायडे यांनी केला.जिल्ह्यातील राजकारणात लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी भूमिका घेतली. तर बंडखोर भाजपचे जिल्हाध्यक्ष ध्रुपदराव सावळे,  जे मुळात पक्षाचे नाही; त्यांच्या चिथावणीस बळी पडून भाजपच्याच लोकांनी विरोध करणे योग्य नाही. यात पक्षाची नाचक्की झाली. ही बाब लज्जास्पद आहे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला विरोध, अन तेही केंद्रात व राज्यात सत्ता असताना! हा विषय समजण्यापलिकडचा आहे, असेही उमा तायडे म्हणाल्या.यारून आमदारांचं जि.प.सदस्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, हे स्पष्ट होते. परंतु या विरोधाची किंमत जि.प.तील सत्ताधारी पक्षांना येत्या लोकसभा निवडणुकीत मोजावी लागेल. जनता एवढी खुळी नाही.जिल्हा परिषदेत निधी वाटपाचा सर्वांना योग्य न्याय मिळाला आहे. त्याचा आढावा मी सादर करणार आहे. माझ्या राजीनाम्याचे काय? तो मी देणारच! परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असे शेवटी उमा तायडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषदUmaitai Tayadeउमाताई तायडेMalkapurमलकापूरBJPभाजपा