बुलडाणा जि.प.सदस्य बेपत्ता
By Admin | Updated: May 25, 2016 01:56 IST2016-05-25T01:56:17+5:302016-05-25T01:56:17+5:30
पोलिस स्टेशनला तक्रार दाखल.

बुलडाणा जि.प.सदस्य बेपत्ता
नांदुरा (जि.बुलडाणा): शिवसेनेचे बुलडाणा जिल्हा उपप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव भोजने गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले असून या घटनेने एक खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जि.प. सदस्य भोजने २३ मे रोजी सायंकाळी वसंतराव भोजने यांनी खामगाव येथे एका रुग्णाला पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून आपल्या कारने (क्रमांक एमएच२८-एएन२८00) एकटे गेले होते. यानंतर ते परतले नाही. त्यांच्यासोबत असलेला भ्रमणध्वनीही बंद आहे. त्यांचा शोध घेतल्यानंतर ते सापडत नसल्याने अखेर विशाल बोरनारे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.