बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे ‘सस्पेन्स’ कायम!

By Admin | Updated: March 21, 2017 02:02 IST2017-03-21T02:02:33+5:302017-03-21T02:02:33+5:30

भाजप- राष्ट्रवादीत एकमत; सत्तेचा समान वाटाघाटीचा फॉर्म्युला, आज होणार निवड

Buldhana Zilla Parishad chairman posts suspense! | बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे ‘सस्पेन्स’ कायम!

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे ‘सस्पेन्स’ कायम!

अनिल गवई
खामगाव, दि. २0- जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपला परंपरागत राजकीय शत्रु काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी त्यांच्याच समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जुळून घेतले; मात्र सत्तेतील ह्यवाटाह्ण देण्यावरून रात्री उशिरापर्यंत राजकीय घडामोडी सुरु होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद व एक सभापतीपद देण्याचे निश्‍चित झाल्याचे समजते.
जिल्हा परिषदेवर भाजपने प्रथमच सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षातील सर्वच नेत्यांचे कमी-अधिक प्रमाणात असलेले योगदान लक्षात घेत सत्तेतील भागिदारीमध्ये सर्वांना समान वाटा देण्याचा फॉर्म्युला तयार केला असल्याचे समजते. पक्षाचे नेते ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. फॉर्म्युलानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सव्वा-सव्वा वर्षांचे ठरले असून, अध्यक्षपदाचा पहिला मान फुंडकरांच्या निकटवर्तीय जयश्री टिकार यांना मिळणार असल्याचे समजते.
बुलडाणा जिल्ह्याचे ह्यमिनी मंत्रालयह्ण असलेल्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून, परंपरागत मित्र असलेल्या शिवसेनेशी काडीमोड घेत, जिल्हा परिषदेत सत्तेचा नवीन फॉर्म्युला भाजपने अस्तित्वात आणला आहे. दरम्यान, सत्ता स्थापन्याबाबत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वेगाने घडलेल्या घडामोडीत, भाजपचा अध्यक्ष, तीन सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपदासह एक सभापतीपद देण्यावर नेत्यांचे एकमत झाले. तथापि, जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागेल, याबाबतचा ह्यसस्पेन्सह्ण कायम असला तरी, समान वाटाघाटीच्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांच्या सत्ता काळाचे विकेंद्रीकरण करण्यात येऊन दावेदारी निश्‍चित करण्यात आली.
यामध्ये सत्ता काळातील पहिल्या सव्वा वर्षांची संधी खामगाव विधानसभा मतदार संघाला देण्याचे ठरले.
त्यानंतर दुसरे सव्वा वर्ष घाटावर, अडीच वर्षानंतरची पहिली टर्म जळगाव जामोद तालुक्याला, तर शेवटची सव्वा वर्षांची टर्म मलकापूर तालुक्याला देण्याचे ठरले आहे.

सत्तेचा समान 'वाटाघाटी' फॉम्र्युला!
जिल्हा परिषदेच्या इतिहासात पन्नास वर्षांनंतर प्रथमच बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आले आहे. जिल्हा परिषदेवर ह्यपरिवर्तनाह्णचा झेंडा फडकविण्यासाठी भाजपच्या सर्व नेत्यांचे कमी-अधिक प्रमाणात योगदान आहे. ही वस्तुस्थिती असली तरी, ह्यनेते सारे एक होऊ, सत्तेचा वाटा सर्वांना मिळवून देऊह्ण या सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या सत्तेतील वाट्याचे विकेंद्रीकरण करीत समान वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासोबतच सभापतीपदासाठीही समान वाटपाचाच फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

1 भाऊसाहेब फुंडकर
बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा परिषदेच्या सत्तेत पहिले अध्यक्षपद आपल्या कार्यक्षेत्रातील युवा उमेदवाराला देण्यासाठी प्रयत्नशील. सोबतच सर्वांना समान न्याय तत्त्वानुसार सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पुढाकार.

2 डॉ. राजेंद्र शिंगणे
जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून डॉ. शिंगणे यांची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीच्या सर्मथनाच्या मोबदल्यात सत्ता काळातील उपाध्यक्षपदासह एक सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे.

3 आ. संजय कुटे
जिल्हा परिषदेच्या पाच वर्षांतील सत्ता काळातील सव्वा वर्षांचा कार्यकाळ आपल्या सर्मथकांकडे खेचण्यासाठी यशस्वी. या पार्श्‍वभूमीवर अडीच वर्षानंतरच्या आरक्षणानंतर घाटाखालील जळगाव जामोदमधील जि. प. अध्यक्ष करण्यास पुढाकार.

4 आ. चैनसुख संचेती
जि.प. अध्यक्षपदाची शेवटची सव्वा वर्षांची टर्म मलकापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्याला (आपल्या सर्मथकाला) मिळवून देण्यात यशस्वी. एक सभापतीपदही मलकापूर संघात जाणार असल्याचे संकेत आहेत.

जि.प.तील पक्षीय बलाबल
भाजप-       २४
शिवसेना-    १0
काँग्रेस-        १३
राष्ट्रवादी-    0८
भारिप-        0२
अपक्ष         -0३

Web Title: Buldhana Zilla Parishad chairman posts suspense!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.