शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: हनुमानसागर धरणाचे दोन दरवाजे ५० सेंमीने उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 15:34 IST

Hanumansagar dam: अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले.

- अझहर अलीसंग्रामपूर (बुलढाणा) : अमरावती, अकोला, बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणाचे दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले. धरणात सध्या स्थिती ७१.४२ टक्के जलसाठा उपलब्ध असून शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास धरणातून वान नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

हनुमानसागर धरणातून वान नदीपात्रात ५२.०८ घ.मी./से पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे वान प्रकल्पाकडून सांगण्यात आले. प्रशासनाकडून वान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गुरुवारी रात्री धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने पाण्याची आवक मोठ्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, धरणाची जलाशय पातळी समुद्रसपाटीपासून ४०६.५० मी. असून धरणात सद्य:स्थितीच ७१.४२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. तर उपयुक्त जलसाठा ५८.५३ दलघमी एवढा आहे. हनुमानसागर धरणाचा पहिला आणि सहावा असे दोन दरवाजे ५० सेमी उघडण्यात आले. धरणातून वान नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने वान नदीला पूर आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण