बुलडाणा जिल्हा विभागात अव्वल

By Admin | Updated: June 9, 2015 00:38 IST2015-06-09T00:38:55+5:302015-06-09T00:38:55+5:30

विभागात सिंदखेडराजा तालुक्याने बाजी मारली.

Buldhana tops in district division | बुलडाणा जिल्हा विभागात अव्वल

बुलडाणा जिल्हा विभागात अव्वल

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षी दहावीच्या परिक्षेत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला असून एकूण ९0.३१ टक्के निकाल लागला आहे. मुलींनी आपला दबदबा कायम ठेवला असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९१.६0 टक्के एवढे आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल सिंदखेड राजा तालुक्याचा ९४.८७ टक्के लागला आहे. हा तालुका अमरावती विभागातही प्रथम ठरला आहे. दहावीच्या परिक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील ४७९ शाळांमधून ४0 हजार ५१८ विद्यार्थी नोंदविले गेले होते. प्रत्यक्षात ४0 हजार ३९२ विद्यार्थ्यांंनी परिक्षा दिली. यामध्ये ३६ हजार ४७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ९0.३१ टक्के एवढा लागला आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.२५ एवढे असून मुलींची टक्केवारी ९१.६0 टक्के एवढी आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वात जास्त ९४.८७ असून सर्वात कमी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नांदूरा तालुक्याचे आहे. या तालुक्यात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८२.४६ आहे. दहावीच्या परिक्षेत प्राविण्य श्रेणीमध्ये ८ हजार ६४३, प्रथम श्रेणीत १४ हजार १७४, द्वितीय श्रेणीत ११ हजार २५२ तर उत्तीर्ण श्रेणीत २ हजार ४0९ विद्यार्थ्यांंचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल सिंदखेड राजा तालुक्याचा ९४.८७ टक्के लागला आहे. तर बुलडाणा तालुका ९४.६८, मोताळा ९३.९७, चिखली ९३.५६, देऊळगावराजा ९४.३५, लोणार ९३.७५, मेहकर ८७.६२, खामगाव ८६.७९, शेगाव ८३.३८, नांदूरा ८२.४६, मलकापूर ९२.४४, जळगाव जामोद ८५.८८ व संग्रामपूर तालुक्याचा ८८.९८ टक्के निकाल लागला आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७२ शाळांचा १00 टक्के निकाल लागला आहे.

Web Title: Buldhana tops in district division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.