Buldhana: सुसाट वेगाने गाडी चालविणे तिघांच्या अंगलट, पोलिसांनी केली कारवाई

By अनिल गवई | Updated: May 6, 2023 12:58 IST2023-05-06T12:58:04+5:302023-05-06T12:58:22+5:30

Buldhana: सुसाट वेगाने गाडी चालविणार्या तिन दुचाकी स्वारांवर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत तिन्ही वाहने शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली.

Buldhana: Three arrested for driving at high speed, police took action | Buldhana: सुसाट वेगाने गाडी चालविणे तिघांच्या अंगलट, पोलिसांनी केली कारवाई

Buldhana: सुसाट वेगाने गाडी चालविणे तिघांच्या अंगलट, पोलिसांनी केली कारवाई

- अनिल गवई

खामगाव - सुसाट वेगाने गाडी चालविणार्या तिन दुचाकी स्वारांवर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत तिन्ही वाहने शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली. या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालविणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अलिकडच्या काळात सुसाट वेगाने तसेच कर्णकर्कश आवाज करीत वाहन चालविण्याची स्पर्धाच वाहन धारकांमध्ये लागून राहीली आहे. अशा वाहन धारकांमुळे लहान बालके भयभीत होतात. त्याचवेळी सामान्यांनाही त्रास होत असल्याने शहर पोलीसांकडून संबंधितांवर कारवाईसाठी मोहिम उघडण्यात आली. शुक्रवारी रात्री खामगाव नांदुरा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर सुसाट वेगाने धावत असलेल्या तीन दुचाकी स्वारांना पकडण्यात आले. तिन्ही दुचाकी शहर पोलीस स्टेशनला लावण्यात आली. तर पुढील कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागालाही पत्र देण्यात आले. पोलीसांच्या या कारवाईमुळे शहरातील बेशिस्त वाहन धारकांना धडा मिळेल, अशी अपेक्षा शहर वासियांमध्ये व्यक्त होत आहे.

Web Title: Buldhana: Three arrested for driving at high speed, police took action