Buldhana: युवकानं गळफास घेऊन संपवलं जीवन
By विवेक चांदुरकर | Updated: January 22, 2024 18:58 IST2024-01-22T18:56:42+5:302024-01-22T18:58:02+5:30
Buldhana: पिंगळी शिवारातील जंगलात एका ३० वर्षीय ईसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.

Buldhana: युवकानं गळफास घेऊन संपवलं जीवन
- विवेक चांदूरकर
संग्रामपूर - पिंगळी शिवारातील जंगलात एका ३० वर्षीय ईसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. संग्रामपूर तालुक्यातील रोहीणखिडकी (शेंबा) येथील दिनेश झिना बोंडळ या ३० वर्षीय यूवकाने पिंगळी जंगलात एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत प्राप्त माहितीनुसार गूमठी येथील एक वनमजूर पिंगळी शिवारातील जंगलात गस्तीवर असतांना मुतक यूवक दिनेश बोंडळ एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने याबाबत मुतकाच्या घरी माहिती दिली असता नातेवाईकांनी घटनास्थळी घाव घेतली. यासंदर्भात २१ जानेवारीला दूपारी जोखलाल मुकूंद बोंडळ यांच्या फिर्यादीवरून सोनाळा पोलीस ठाण्यात अकास्मित मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. यूवकाच्या आत्महत्या करण्यामागील कारण अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.