शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचा अधिकार्‍याला घेराव; तीव्र आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:48 IST

बुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला मिळावा, यासाठी १५ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला. 

ठळक मुद्देटॉवर उभारणीतील शेतकरी मोबदल्यापासून वंचित 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या अनेक वर्षांपासून मौजे पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये महाराष्ट्र ईस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनीने टॉवर उभारणीचे काम केले होते. या कामामध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत; परंतु त्या शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांचा मोबदला मिळावा, यासाठी १५ जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ज्या कर्मचार्‍यांकडे महाराष्ट्र ईस्टर्न ग्रिड पॉवर ट्रान्समिशन कंपनीचे टॉवर उभारणीचे काम होते, त्या कर्मचार्‍यांना धारेवर धरून पांढरदेव, एकलारा व बोरगाव काकडे येथील शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. पांढरदेव, एकलारा व बोरगाव काकडे येथील शेतकर्‍यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. अशाच प्रकारे शासनाने शेतकर्‍यांच्या जमिनीवर आज रोजी याच कंपनीने अनेक टॉवर उभे केले आहेत; परंतू आतापर्यंत शेतकर्‍यांना कंपनीने तोकडी मदत देऊन टॉवर उभारणीचे काम केले आहे. म्हणून शासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन महाराष्ट्र ईस्टर्न ग्रिड पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या चुकीच्या निर्णयाने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. म्हणून कंपनीला शासनाने तत्काळ आदेश देऊन शेतकर्‍यांचा राहिलेला मोबदला त्यांना मिळवून द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आंदोलनामध्ये अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम, कडूबा मोरे, अमीन खसाब, शेख वसीम, मो. साजीद, सैय्यद जहीरोद्दीन, शुत्रुघ्न तुपकर, समाधान धंदर, गोपाल जोशी, रामेश्‍वर जाधव यांच्यासह पांढरदेव, एकलारा, बोरगाव काकडे येथील शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन