शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

बुलडाणा : सुबोध सावजींचा विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू; पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 8:10 PM

डोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी १८ जानेवारीपासून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १४२० गावातील शासकीय नळपाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी अधिकार्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, २४० गावांतील योजनांचे आॅडीट करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १८ जानेवारीपासून विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सोनाटी-बोरी नळयोजनेच्या विहीरीत दुपारी चार वाजता बसून हे आंदोलन सुरू केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीअंतर्गत हे  विहीरीत बसून उपोषण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. एका एका गावात चार-चार पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. पण गावांना प्यायला पाणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी प्रकरणी कारवाई करीत नसल्याने माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी विहीरीत बसून हे उपोषण सुरू केले आहे.१८ जानेवारीला सायंकाळी पाच वाजता ७३ वर्षीय माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे विहीरीत बैलगाडीच्या पाळण्याद्वारे उतरले व त्यांच्या आंदोलनास सुरूवात झाली आहे. बोरी गावच्या चारही विहीरी पूर्ण होऊन पाणीपुरवठा योजनेवर एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च झाला आहे. पण गावाला पाणी नाही. ऐवढेच नाही तर नळयोजनेच्या विहीरींचे दानपत्रही नाही. विहीर आजही शेतकर्याच्या ताब्यात  आहे. जिल्ह्यातील या सर्वंकषस्तरावली पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिव तथा विभागीय आयुक्तांना भेटून त्याबाबत तक्रारही केली होती. जिल्ह्यातील १४२० गावातील  पाणीपुरवठा योजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून २४० गावांची चौकशी करून आॅटीच करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र जिल्ह्यातील अधिकार्यांनी आजपर्यंत कोणावरही कारवाई न केल्यामुळे सुबोध सावजी यांनी ही आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत नळयोजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई होत नाही तोवर आंदोलन चालू ठेवण्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. विहीरीत बसूनच त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

१९९७ मध्येही आंदोलनामुळे चर्चेतसुबोध सावजी यांनी १९९७ मध्येही बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील मातमळ गावातील विहीरीत बसून आंदोलन केले होते. सुबोध सावजींच्या  या आगळ््या वेगळ््या आंदोलनामुळे ते त्यावळी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा २१ वर्षांनी ते याच पद्धतीने आंदोलन करीत आहेत. 

खून करण्याचाही इशारापाणीपुरवठा योजनांनमध्ये भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालणार्यांचा खून करण्याचा इशाराही त्यानी गेल्या वर्षी दिला होता. त्यासंदर्भात सुबोध सावजी यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी चौकशीही केली होती. 

टॅग्स :Subodh Savjiसुबोध सावजीbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन