बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर!
By Admin | Updated: July 12, 2016 00:22 IST2016-07-12T00:22:26+5:302016-07-12T00:22:26+5:30
पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीत; हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली.

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर!
बुलडाणा : जिल्ह्यामध्ये गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. खामगाव, नांदुरा, व सिंदखेड राजा तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत.
जिल्ह्यात रविवारी सकाळी पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी रात्री उशिरापर्यंंत पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या या पावसामुळे सोमवारी अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती, तर काही शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांंनी अघोषित सुटी दिली.
संततधार पावसामुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवार व सोमवारला सकाळी काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात नांदुरा व खामगाव व सिंदखेड तालुक्यात अतवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची नोंद करण्यात आली. यात बुलडाणा तालुक्यात ५८ मिमी, चिखली ३२ मिमी, देऊळगाव राजा ४७ मिमी, मेहकर ४0 मिमी, लोणार ४३ मिमी, सिंदखेड राजा ६६ मिमी, मलकापूर ४१ मिमी, मोताळा ५७ मिमी, नांदुरा ७२ मिमी, खामगाव ६७ मिमी, शेगाव ६२ मिमी, जळगाव जामोद ५४ मिमी आणि संग्रामपूर तालुक्यात ६३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाची सरासरी २0.१ मि.मी आहे. दिवसभर पाऊस झाल्याने सर्वच तालुक्यात पावसाची आकडेवारी वाढणार आहे.
आतापयर्ंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. त्याची सरासरी १६२.२ मि.मी. आहे. पावसाची नोंद करण्यात आली. याप्रमाणे जिल्ह्यात एकूण ६९६ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून, त्याची सरासरी ५३.५ मि.मी आहे. आतापर्यंंत सर्वात जास्त पाऊस लोणार तालुक्यात झाला असून, सर्वात कमी पाऊस जळगाव जामोद तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंंत पडलेल्या पावसाची सरासरी २४0.८ मि.मी आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळीही वाढत आहे. नळगंगा प्रकल्पात ४.३९ टक्के जलसाठा असून, पेनटाकळी - ३.९१ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात मृत जलसाठा असून, मध्यम प्रकल्प असलेले पलढग - ३.६0 टक्के, ज्ञानगंगा - १६.३१ टक्के, मस - ८.२ टक्के, कोराडी - १.७८ टक्के, मन - १२.६६ टक्के, तोरणा - ४.७२ टक्के, उतावळी - ८.४0 टक्के जलसाठा आहे.
बाजारपेठ ठप्प
रविवार व सोमवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठ ठप्प होती. नागरिक केवळ काही कामानिमित्तच बाहेर निघाले. सोमवारी दिवसभर बुलडाणा, खामगाव, लोणार, शेगाव येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ग्राहकच नसल्यामुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे.