शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
2
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
3
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
4
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
5
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
6
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
7
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
8
"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?
9
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
10
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
12
"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य
13
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
14
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
15
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
16
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा
17
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
18
Tarot Card: उक्तीला कृतीची जोड हवी, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आठवडा!
19
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
20
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!

Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

By अनिल गवई | Published: March 22, 2024 8:22 PM

Buldhana Crime News: जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. 

-अनिल गवई खामगाव - जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. 

खामगाव तालुक्यातील उमरा येथील श्रीरंग पन्हाळकर यांनी २८ सप्टेंबर २०१२ रोजी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार २७ सप्टेंबर २०१२ रोजी ते घरी असताना त्यांच्या रामेश्वर नामक मुलाने त्यांना महादेव जगदेव घोरपडे (३७), रा. अटाळी हा शेतातील तीळ चोरून नेत आहे. त्याला हटकले असता जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करीत असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर या सर्व प्रकार माझा भाचा अरविंद मुळीक यांना सांगितला. गजानन कदम आणि माझे भाच्यासह शेताच्या दिशेने निघाल्यानंतर आरोपी महादेव घोरपडे हा गावातील शे. अस्लम यांच्या शेताजवळ भेटला. त्याला या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्याने वाद घालून झटापट केली. त्याच्या जवळील गुप्तीने भाचे अरविंद याच्या बरगडीत मारून जखमी केले. तसेच, त्याला आवरण्यास गेलो असता माझ्या दंडावर गुप्ती मारून जखमी केले.

त्यावेळी गजानन कदम यांनी वाद सोडविल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४, ३२६, ५०४, ५०६, नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याने सुनावणी दरम्यान न्यायालयाने दहा साक्षीदार तपासले. अभियोग पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश व्ही.व्ही. राजूरकर यांनी आरोपीस भादंवि कलम ३२६ मध्ये दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास व दंडाच्या रकमेतून चार हजार रुपये जखमी अरविंद मुळीक यास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी