शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

बुलडाणा : मलकापूर पांग्रानजीक साडेचार लाखाचा गुटखा जप्त; दोन आरीपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:27 PM

साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या  वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले.

ठळक मुद्देजिल्ह्यात गुटखा पाठविण्याच्या उद्देशाने गुटखा माफीया चिखलीवरून मलकापूर पांग्रा येथे एम.एच.२८ ए.बी. ५४९९ क्रमांकाच्या वाहनाने गुटखा आणत होते. गुटखा वाहतूक होत असल्याची गोपणीय माहीती मिळाल्यावरुन पोलीसांनी सापळा रचून सकाळी तीन वाजता सदर वाहन पकडले. यामध्ये चार लाख ५० हजार रूपयांचा गुटखा व ५ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.

साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या  वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले असून, यामध्ये ४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा व ५ लाख ५० हजार रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. गुटखा वाहतूक प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील गुरूवारी बाजार असल्याने बाहेर जिल्ह्यातील व्यापारी येथे येतात. त्यामुळे बाहेर जिल्ह्यात गुटखा पाठविण्याच्या उद्देशाने गुटखा माफीया चिखलीवरून मलकापूर पांग्रा येथे एम.एच.२८ ए.बी. ५४९९ क्रमांकाच्या वाहनाने गुटखा आणत होते. गुटखा वाहतूक होत असल्याची गोपणीय माहीती मिळाल्यावरुन पोलीसांनी सापळा रचून सकाळी तीन वाजता सदर वाहन पकडले. यामध्ये चार लाख ५० हजार रूपयांचा गुटखा व ५ लाख ५० हजार रुपयांचे वाहन असा एकूण दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी शे. शारुख शे . लाल आणि अमिरखा नबिखा पठाण (रा. चिखली) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरPoliceपोलिस