शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : सैलानी यात्रेतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:30 IST

बुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. 

ठळक मुद्देदोन वर्षांपूर्वी झाला होता सैलानी यात्रेत खून तिसरा आरोपी फरार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सैलानी यात्रेत एकाचा गुप्ती व बर्फ फोडण्याच्या टोचाद्वारे वर्मी वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हा न्यायालयाने ३0 जानेवारी रोजी दाघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २८ मार्च २0१६ रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. सैलानी यात्रेच्या शेवटच्या दिवशी संदल सुरू असताना चिखली येथील २९ वर्षीय शेख इम्रान शेख इकबाल याच्यावर इकबाल नगरमध्ये राहणारे अबू बकर ऊर्फ अली खान (वय २८), शेख सद्दाम शेख मेहबूब (वय २७) आणि शेख इरफान ऊर्फ काल्या (वय २८, रा. मिलिंद नगर) या तिघांनी तिक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने वार केले होते. गंभीर जखमी शेख इम्रान याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होण्याआधीच मृत्यू झाला होता. घटना घडतेवेळी शेख इम्रानचे मित्र शेख मुबारक, इम्रान खान आणि अली खान हे घटनास्थळी उपस्थित होते. आपल्या मित्रावर वार होत असताना या तिघांनी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता; परंतु मध्ये पडाल तर तुमचाही मुडदा पाडू, अशी धमकी अबू बकरने या तिघांना दिल्यामुळे ते बाजूलाच थांबले. दरम्यान, न्यायालयात सुनावणीदरम्यान त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.याप्रकरणी रायपूर पोलिसांनी संगनमताने खून केल्याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते. सदर खूनप्रकरणी एसडीपीओ बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनात तत्कालीन ठाणेदार गावंडे तसेच एपीआय जे.एन. सैयद, कोर्ट कामकाज पाहणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.  त्यांनी अबू बकर आणि सद्दाम यांना अटक केली    होती; परंतु तिसरा आरोपी शेख इरफान अद्यापही फरार आहे. या खूनप्रकरणी ८ जून २0१६ रोजी   जिल्हा न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदार तपासले गेले. जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड. अमोल बल्लाळ  यांनी आरोपीविरुद्ध प्रबळ युक्तिवाद केला.आरोपी अबू बकर हा इतरही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अडकलेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. न्यायालयाने याप्रकरणी निकाल देत अबू बकर आणि शेख सद्दाम या दोघांना इम्रानच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले. दोघांनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावल्याचे निकालात नमूद केले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrimeगुन्हाbuldhanaबुलडाणा