बुलडाणा नगराध्यक्ष बदलाचे संकेत
By Admin | Updated: October 19, 2015 01:38 IST2015-10-19T01:38:39+5:302015-10-19T01:38:39+5:30
राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; डॉ. शिंगणे घेणार निर्णय.

बुलडाणा नगराध्यक्ष बदलाचे संकेत
बुलडाणा : नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील यांच्या सव्वा वर्षाचा कार्यकाळ सं पुष्टात आल्याने ठरल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला. नवा नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या असून , १९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे. बुलडाणा नगर पालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. पहिले अडीच वर्ष नगराध्यक्षपद काँग्रेसकडे होते. त्यानंतर हे पद राष्ट्रवादीकडे आले. मात्र, या अडिच वर्षात सव्वा सव्वा वर्ष ठरविण्यात आले होते. त्यानुसार पहिले सव्वा वर्ष अंभोरे पाटील यांना देण्यात आले. यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपुष्ठात आला असून पुढील सव्वा वर्ष मो.सज्जाद यांना देण्याचे ठरविण्यात आल्याने नगराध्यक्ष बदलण्याच्या हालचालीला वेग आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सोमवारी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बैठक बोलावली असून ठरल्या प्रमाणे मो.सज्जाद यांना नगराध्यक्ष करायचे की अंभोरे पाटील यांनाच पुढील सव्वा वर्ष द्यायचे या बाबत राष्ट्रवादीचा निर्णय होऊन त्यानंतर काँग्रेसचे संजय राठोड तसेच आ. हर्षवर्धन सपकाळ यांचेशी चर्चा करण्यात येऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.