Buldhana: आयपीएलच्या जुगारावर धाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल, दुसरी धडक कारवाई

By अनिल गवई | Published: April 16, 2024 02:30 PM2024-04-16T14:30:09+5:302024-04-16T14:30:53+5:30

Buldhana Crime News: आयपीएलच्या क्रीकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा अड्यावर धाड मारून पोलीसांनी तिंघाविरोधात कारवाई केली.  ही कारवाई सोमवारी रात्री ९:३० वाजता जुना बसस्थानक परिसरातील एका वाईनबार आणि रेस्टारंटमध्ये करण्यात आली. यात ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Buldhana: IPL gambling raid, case registered against three, second strike action | Buldhana: आयपीएलच्या जुगारावर धाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल, दुसरी धडक कारवाई

Buldhana: आयपीएलच्या जुगारावर धाड, तिघांविरोधात गुन्हा दाखल, दुसरी धडक कारवाई

- अनिल गवई
खामगाव -आयपीएलच्या क्रीकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा अड्यावर धाड मारून पोलीसांनी तिंघाविरोधात कारवाई केली.  ही कारवाई सोमवारी रात्री ९:३० वाजता जुना बसस्थानक परिसरातील एका वाईनबार आणि रेस्टारंटमध्ये करण्यात आली. यात ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तक्रारीनुसार, जुन्या बस स्थानक परिसरातील प्रतिक वाइनबार आणि रेस्टारंटमध्ये आयपीएल सामन्यावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधिक्षकांना मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर संबधित ठिकाणी पोलीसांनी छापा मारला असता, तेथे दोन इसम रंगीत टिव्हीवर सुरू असलेल्या सनराईजर्स हैदराबाद व रॉयर्ल्स चॅलेजर बंगलोर या संघामध्ये क्रिकेट दरम्यान सट्टा खेळताना आणि खेळविताना रंगेहात आढळून आले. त्यांनी आपली नावे अनुक्रमे संजयकुमार चंद्रसेन मोरानी ४० रा. िसंधी कॉलनी, खामगाव आणि नितीनकुमार सुरेश कुमार नथानी ३५ रा. सिव्हील लाइन खामगाव अशी सांगितली. त्यांच्या जवळून मोबाईल, रोख १२५० रूपये, रंगीत टिव्ही, सेटअप बॉक्स असा एकुण ४५ हजार पाचशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

उपरोक्त दोन्ही आरोपींना कलम ४१ (1) जाफौ प्रमाणे गुन्ह्यात अटक न सुचनापत्र देऊन सोडून देण्यात आले. मुद्देमाल शहर पोलीस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आला. तर दोघांनी दिलेल्या माहितीवरून बुकी तथा सट्टा मालक निखिलकुमार भाटीया रा. लक्कडगंज, संजयकुमार मोरानी, नितीनकुमार नथानी या तिघांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा १२ अ, सहकलम १०९ भादंिवप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसपी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी व डीबी पथकाचे पीएसआय विनोद खांबलकर, हेकॉ संदीप टाकसाळ, पोकॉ प्रवीण गायकवाड, देवा चव्हाण, केशव झ्याटे महिला पोलिस पल्लवी बोर्डे,संतोष वाघ यांनी केली आहे.

Web Title: Buldhana: IPL gambling raid, case registered against three, second strike action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.