शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने केला खून, पळसखेड येथील घटना

By संदीप वानखेडे | Updated: October 30, 2023 19:52 IST

Buldhana News: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़.

- संदीप वानखडे लाेणार - अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकराने गळा दाबून खून केला़ ही घटना २८ ते २९ ऑक्टाेबर दरम्यान घडली़ या प्रकरणी लाेणार पाेलिसांनी संशयित आराेपीस ताब्यात घेऊन पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला़ आराेपी प्रियकराविरुद्ध पाेलिसांनी ३० ऑक्टाेबर राेजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला़ राजाराम गजानन जायभाये असे मृतकाचे नाव आहे. 

लोणार तालुक्यातील पळसखेड येथील राजाराम गजानन जायभाये हे २८ ऑक्टाेबरपासून बेपत्ता झाले हाेते़ त्यांचा शाेध घेत वडील गजानन आनंदराव जायभाये यांनी लाेणार पाेलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली हाेती़ अशातच राजाराम जायभाये यांचा मृतदेह २९ ऑक्टाेबर राेजी शेतात आढळला हाेता़ घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोढे, विशाल धोंडगे, नितीन खरडे संतोष चव्हाण, भाऊसाहेब मोरे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी हाेती़ तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला हाेता.

सहायक पोलिस निरीक्षक युवराज रबडे व पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे यांनी अधिक तत्परतेने पोलिसी तपास चक्रे फिरवली व घटनास्थळी पोलिसांच्या सोबतच सुगावा घेण्यासाठी उभा असलेला आरोपी संतोष थोरवे रा़ पळसखेड याला संशयावरून ताब्यात घेतले़ त्याला पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली़ तसेच मृतक हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने पाेलिसांसमाेर दिली़ या प्रकरणी मृतकाचे वडील गजानन आनंदराव जायभाये यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष थोरवे विरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश घोगरे व ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारbuldhanaबुलडाणा