बुलडाण्यात ५ नगराध्यक्ष पदे काँग्रेसकडे!
By Admin | Updated: July 17, 2014 23:59 IST2014-07-17T22:56:14+5:302014-07-17T23:59:26+5:30
कॉंग्रेस पक्षाने नऊपैकी पाच नगराध्यक्ष पदे काबिज करीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

बुलडाण्यात ५ नगराध्यक्ष पदे काँग्रेसकडे!
बुलडाणा : कॉंग्रेस पक्षाने गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकींमध्ये जिल्ह्यातील नऊपैकी पाच नगराध्यक्ष पदे काबिज करीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकी गुरुवारी पार पडल्या. शेगाव, मलकापूर व मेहकर येथील नगराध्यक्ष अविरोध निवडून आले असून, इतर सहा ठिकाणी झालेल्या निवडणकींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम रहिले. एकूण नऊपैकी पाच पालिकांमध्ये काँग्रेसचे, तर प्रत्येकी दोन पालिकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विराजमान झाले. बुलडाण्याच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे टी. डी.अंभोरे पाटील विराजमान झाले आहेत. देऊळगाव राजामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मालती कायंदे, खामगावमध्ये कॉंग्रेसचे अशोक सानंदा, काँग्रेस, शेगावमध्ये कॉंग्रेसचे प्रमोद देशमुख, मलकापूरमध्ये कॉंग्रेसच्या मंगला पाटील, चिखलीत कॉंग्रेसच्या शोभा सवडतकर, मेहकरमध्ये कॉंग्रेसच्या हसीनाबी गवळी, जळगाव जामोदमध्ये भाजपाचे रामदास बोंबटकर, तर नांदूरामध्ये भाजपाच्या पुष्पा झांबरे विजयी झाल्या.