Buldhana: हरभरा पिकाची सुडी पेटवली, शेतकऱ्यांचे तीन लाख, पाच हजार रुपयांचे नुकसान
By संदीप वानखेडे | Updated: March 5, 2024 19:20 IST2024-03-05T19:20:06+5:302024-03-05T19:20:31+5:30
Buldhana News: शेतातील हरभरा पिकाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ५ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Buldhana: हरभरा पिकाची सुडी पेटवली, शेतकऱ्यांचे तीन लाख, पाच हजार रुपयांचे नुकसान
- संदीप वानखडे
धाड - शेतातील हरभरा पिकाची सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना ५ मार्च राेजी उघडकीस आली़ या प्रकरणी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाड येथील चंद्रकला बंडू खेडकर यांच्या मालकीच्या गट न.२१५ शेती ही आनंदा केशव गुजर यांनी ठोक्याने करारावर पेरणी केली होती. यामध्ये त्यांनी साधारण
तीन एकर मधील डॉलर हरभऱ्याची लागवड केली होती हरबरा पिक सोंगणी करुन सुडी रचुन ठेवली हाेती़ अज्ञात व्यक्तीने ही सुडी पेटवून दिल्याने त्यांचे तिन लाख पाच हजार रूपयांचे नुकसान झाले़ या प्रकरणी धाड पाेलिसात तक्रार देण्यात आली आहे़ घटनेचा पंचनामा तलाठी प्रभाकर गवळी व धाड पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी केला आहे़ नुकसानग्रस्त शेतकरी आनंदा गुजर यांना मदत देण्याची मागणी होत आहे.सुडी पेटवून देणाऱ्या व्यक्तीचा शाेध घेवून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़