शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

Buldhana: ठेवीदारांची ६ काेटींनी फसवणूक, उन्नती महिला पतसंस्थेच्या संचालकांसह लेखापालावर गुन्हे

By सदानंद सिरसाट | Updated: July 13, 2023 15:38 IST

Buldhana: उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर संस्थेमध्ये ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुद्ध गुरुवारी दुपारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

- सदानंद सिरसाटबुलढाणा -  उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर संस्थेमध्ये ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुद्ध गुरुवारी दुपारी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, न्यायालयीन आदेशानंतरही ही कारवाई झाली आहे.

उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेत ८१ लाख २४ हजार रुपयांच्या जमा असलेल्या ठेवी परत न केल्याने याबाबतची वैयक्तिक तक्रार मलकापूर तालुक्यातील कुलमखेड येथील वैभव गणेशराव पाटील (३२) यांनी केली. त्यानुसार मलकापूर शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४, सहकलम १४६ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये आरोपी पतसंस्था अध्यक्षा अंजली सुमंतराव पंत, रा. मलकापूर, लेखापाल रमेश प्रल्हाद तांदुळे यांच्यासह संचालकांनी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ठेवीदारांची ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांनी फसवणूक केल्याचे नमूद आहे. सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक वसंत प्रभाकर राठोड यांच्याकडून अंकेक्षण करण्यात आले. त्यांच्या लेखापरीक्षण अहवालानुसारही तक्रार करण्यात आली. त्यानुसार भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६८, ४७०, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी मलकापूर शहरातील रहिवासी अंजली सुगतराव पंत, उषा दामोदरदास लखानी, अपर्णा दिलीपराव देशपांडे, प्रभावती मधुकर भलभले, ज्योती गजानन पंत, मनीषा विवेक बापट, नरसीम बेगम नासीर खान, सुनीता अनंत चव्हाण, वैशाली संतोषगीर गिरी, रूपाली सुरेश वैद्य, शर्मिष्ठा राजेश यावलकार, व्यवस्थापक राजेश वसंत चव्हाण, सुनीता गजानन जाधव, रमेश प्रल्हाद तांदुळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास बुलढाणा आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.- न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

पतसंस्थेच्या महिला अध्यक्ष, संचालकांनी गैरकायदेशीरपणे कर्ज वाटप केले. त्यापैकी ८१ लाख २४ हजार रुपये परत न केल्याने वैभव पाटील यांनी कलम १५६ (३) नुसार प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्यावर न्यायालयाने ८ जून रोजी गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाने पतसंस्थेच्या अध्यक्षा, संचालक, लेखापाल, व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा