Buldhana: वनपरिक्षेत्र कायार्लयालगतचे तारेचे कुंपण काढण्यासाठी उपोषण
By अनिल गवई | Updated: March 21, 2023 16:37 IST2023-03-21T16:37:28+5:302023-03-21T16:37:38+5:30
Buldhana: खामगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालगतचे तारेचे कुंपन काढण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले.

Buldhana: वनपरिक्षेत्र कायार्लयालगतचे तारेचे कुंपण काढण्यासाठी उपोषण
- अनिल गवई
खामगाव: येथील वनपरिक्षेत्र कार्यालगतचे तारेचे कुंपन काढण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी शासकीय कार्यालयाचे उपोषण काढण्यासाठी ती्व्र निदर्शनेही करण्यात आली.
खामगाव नांदुरा रस्त्यावरील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयालगत तारेचे कुंपन करण्यात आले. याबाबत जिल्हािधाकरी आिण संबधित अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, संबंधितांवर कारवाई न झाल्याने मंगळवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले. तसेच वनपरिक्षेत्र कार्यालयाचे तारेचे कंुपन काढण्यासाठी उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.
या साखळी उपोषणात अमीत तळपते, िनतीन वावगे, आकाश सातव, निलेश देशमुख, प्रकाश मोरे, अनिरूध्द चेंडाळणे, रवी जैन, किसन जाट यांच्यासह सामाजिक कार्यकतेृ मोर्ठ्यासंख्येने उपस्थित होते.