Buldhana: बहिणीच्या चारित्र्यावर संशय: तिघांकडून जावायासह वडीलांना मारहाण

By अनिल गवई | Published: April 16, 2024 02:59 PM2024-04-16T14:59:05+5:302024-04-16T15:00:52+5:30

Buldhana Crime News: बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

Buldhana: Doubt on sister's character: Father with son-in-law beaten up by trio | Buldhana: बहिणीच्या चारित्र्यावर संशय: तिघांकडून जावायासह वडीलांना मारहाण

Buldhana: बहिणीच्या चारित्र्यावर संशय: तिघांकडून जावायासह वडीलांना मारहाण

- अनिल गवई 
खामगाव - बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, स्थानिक सावजी ले आऊटमधील विजय प्रल्हाद वाडेकर ३४ रात्री घरी होते. त्यावेळी रघुनाथ विश्वनाथ घोपे २५ आणि गणेश विश्नाथ घोपे दोघेही रा. भालेगाव बाजार, लकी घोपे रा. खामगाव हे तिघे वाडेकर यांच्या घरी आले. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत, ती दारू पिते म्हणून त्रास देत असल्याचा जाब विचारत, आपण आणि आपल्या वडिलांना हिरव्या रंगाच्या फावड्याच्या दांड्याने आरोपी रघुनाथने अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तर आरोपी गणेश याने आपल्या वडिलांच्या डाव्याजवळ दगड मारून जखमी केले. त्याचवेळी लकी घोपे याने आपल्या वडिलांचे पाठीमागून हात धरले. जीवे मारण्याची धमकी िदल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिन्ही आरोपी िवरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

Web Title: Buldhana: Doubt on sister's character: Father with son-in-law beaten up by trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.