शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटरने खालावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:08 IST

बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.

ठळक मुद्देमार्चअखेर अडीच मीटर खोल जाण्याची भीती टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा विचार करता ती ही झपाट्याने कमी होत असून, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात ती घटली आहे.त्यामुळे मार्च अखेर जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्ह्यातील ७४८ गावात राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, जिल्हाधिका-यांनी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळी सवलतीचा अर्ध्या जिल्ह्याला फायदा होणार असला तरी पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून, ८८ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुमारे १८ लाख लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न येत्या काळात जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने सोडवावा लागणार आहे.वार्षिक सरासरीच्या १०७ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला असला तरी ओढ देत हा पाऊस आल्याने आॅक्टोबर अखेर अपेक्षित अशी भूजलपातळी यंदा गाठल्या गेली नसल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातच गेल्या पाच वर्षाचा विचार करता २०१३ मध्ये वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी ही सरासरीमध्ये ०.३९ मीटर दाखवत असली तरी उपरोक्त चार तालुक्यात त्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा ही भूजल पातळी दीड मीटरने खालावली असून, मार्च अखरे ही पाणी पातळी अडीच मीटरने आणखी खोल जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.परिणामी जिल्ह्यातील १०१ पेक्षा अधिक गावांवर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होणार यात शंका नाही. ग्रामीण पाणीपुरव्याची भिस्त असलेल्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही अवघा १२ टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक आहे. 

सिंदखेडराजा तालुक्यालाही फटका! सिंदखेडराजा तालुक्याची भूजल पातळी ही जानेवारीमध्येच गत वर्षीच्या तुलनेत २.३१ मीटरने खोल गेली आहे. मलकापूर तालुक्याचीही २.०१ मीटरने ती खालावली असून, लोणार तालुक्याचीही १.७० मीटरने पाणी पातळी खालावली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वीच घसरलेल्या भूजल पातळीमुळे जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात विंधन विहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यात आता लोणार तालुक्याचीही प्रसंगी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्याची सध्याची भूजल पातळी ही दीड मीटरने खालावलेली असून, १६७ निरीक्षण विहिरींची पाहणी करून ती काढण्यात आली आहे. मार्च अखेर पुन्हा त्यात घट होण्याची शक्यता आहे.

खामगाव तालुक्यातील चार नळ योजनांची दुरुस्ती पाणीटंचाई निवारणार्थ खामगाव तालुक्यातील खौलखेड, वाडी, घाटपुरी व कोक्ता या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. अन्य योजनांतून या कामासाठी या गावांना निधी भेटलेला आहे किंवा नाही, याची तपासणी करूनच ही कामे करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी सूचित केले आहे. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा १९ कोटी रुपयांचा असून, सध्या टंचाई निवारणासाठी विहीर अधिग्रहणावर प्रशासनासह गावांची भिस्त आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा