बुलडाणा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय!

By Admin | Updated: May 6, 2015 00:26 IST2015-05-06T00:26:53+5:302015-05-06T00:26:53+5:30

‘लेक वाचवा’ अभियानाला बळकटी : दोन वर्षात ५ हजार ४ मुलांचा तर ५ हजार ३ मुलींचा जन्म.

Buldhana district's girl child is growing! | बुलडाणा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय!

बुलडाणा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढतोय!

नाना हिवराळे / खामगाव: मुलगा हा वंशाचा दिवा ही खुळचट भावना आता लेक वाचवा अभियानामुळे मागे पडली आहे. खामगाव येथील सामान्य रूग्णालयात गत दोन मुलींचा जन्मदर मुलांच्या बरोबरीत आल्याचे दिसून आले. गत दोन वर्षाच्या कालावधीत ५ हजार ४ मुले तर ५ हजार ३ मुलीचा जन्म झाला आहे. जन्मलेल्या बालकाच्या नोंदीवरून मुलीचा जन्मदर वाढल्याचे हे शुभसंकेत आहेत. पाच वर्षाअगोदर राज्यात मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत बराच मागे होता. बुलडाणा जिल्ह्यात हे प्रमाण प्रति १ हजार मुलामागे ८३२ मुली एवढे होते. गर्भलिंग चाचणीत मुलगी असल्याचे आढळून आल्यानंतर मुलीची गर्भातच हत्या करण्याचे प्रमाण वाढले होते. मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक असल्याने शासनाने ह्यलेक वाचवाह्ण अभियान सुरू केले. मुलींची गर्भातच हत्या करणार्‍या पालकांना कठोर शिक्षा देण्याचा कायदा लागु करण्यात आला. खामगाव येथील सामान्य रूग्णालयात २0१३-१४ या वर्षात एप्रिल ते मार्चपर्यंंत एकुण ४ हजार ७00 बालके जन्माला आली. यामध्ये २ हजार ३१८ मुले तर २ हजार ३८२ मुलींच्या जन्माची नोंद आहे. या वर्षात मुलापेक्षा ६४ मुलीचा जन्मदर वाढला आहे. तर सन २0१४-१५ एप्रिल ते मार्चपर्यंंत वर्षभरात ५ हजार ३0७ बालकांचा जन्म झाला. यामध्ये २ हजार ६८६ मुले तर २ हजार ६२१ मुलींचा समावेश आहे. या वर्षात ६५ मुलींचा मुलापेक्षा जन्म कमी झाला आहे. २0१४ व २0१५ या दोन वर्षाचा विचार केला असता मुला-मुलीच्या जन्माचे प्रमाण जवळजवळ सारखेच आलेले दिसेल. सामान्य रूग्णालयात दर महिन्याला ४00 पेक्षा जास्त प्रसुती होत असल्याचे आकडेवारीवरून समजते.

Web Title: Buldhana district's girl child is growing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.