शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचातींसाठी रणधुमाळी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:33 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते  ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात  राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. 

ठळक मुद्देग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग ५ ते ११ डिसेंबरदरम्यान सादर करता येणार नामनिर्देशनपत्र 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते  ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात  राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहे त. बुलडाणा जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींची दुसर्‍या टप्प्यातील निवडणूक २६ डिसेंबर रोजी होत आहे. सर पंच पद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणुका खर्‍या अर्थाने सरपंच पदाभोवतीच  केंद्रित झाल्या आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ५ ते ११ डिसेंबरदरम्यान सकाळी ११ ते दु पारी ४.३0 पर्यंत सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र सादर केले जाणार आहेत. १२ डिसेंबर  रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी, १४ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेणे, १४ डिसेंबरला दुपारी  ३.३0 नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. २६ डिसेंबर रोजी मतदान तर २७ डिसेंबर  रोजी निकाल घोषित होणार आहे.  

या ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूकबुलडाणा तालुक्यातील साखळी, घाटनांद्रा, पिंपळगाव सराई, चिखली तालुक्यातील डोंगरशेवली,  करणखेड, खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहागीर, धानोरी, मेरा खु., अंबाशी, असोला बु.,  देऊळगावराजा तालुक्यात भिवगाव, दगडवाडी, असोला जहांगीर, मेहकर तालुक्यात कळंबेश्‍वर,  घाटबोरी, चायगाव, जानेफळ, बार्‍हई, बेलगाव, मारोती पेठ, लोणार तालुक्यात दे. वायसा, पारडी,  सोमठाणा, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद, दरेगाव, पांग्री उगले, तांदुळवाडी, मोहाडी, वडी,  नसिराबाद, मलकापूर तालुक्यात केवळ एकच देवधाबा येथे निवडणूक होत आहे. मोताळा तालु क्यात डिडोळा, गोतमारा, खामगाव तालुक्यात जयपूर लांडे, अटाळी, घारोड, रोहणा, शेगाव  तालुक्यात टाकळी धारव, कालखेड व जळगाव जामोद तालुक्यात निवडी अजमपूर, कुवरदेव,  जामोद या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे