बुलडाणा जिल्ह्याती अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:17 AM2018-01-23T01:17:13+5:302018-01-23T01:18:27+5:30

बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.

Buldhana district will be open to the brot of schools | बुलडाणा जिल्ह्याती अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार!

बुलडाणा जिल्ह्याती अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार!

Next
ठळक मुद्देनॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे विद्यार्थ्यांची रॅण्डम पद्धतीने निवड

हर्षनंदन वाघ। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीची क्षमता ओळखण्यासाठी शासनाने निवडक विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याचे ठरविले आहे. ही चाचणी देशभरात एकाचवेळी ५ फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ८0 शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची एका वर्गाची निवड एनसीईआरटीने रॅण्डम पद्धतीने केली आहे. या चाचणीच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री चालणार्‍या अप्रगत शाळांचे पितळ उघडे पडणार आहे.
शासन निर्णयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमांचे फलित काय, हे तपासण्यासाठी शासनाने सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्याला एनएएस (नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे) हे नाव देण्यात आले आहे. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. 
चाचणीत बहुपर्यायी प्रश्न राहणार आहेत. १0 वीसाठी भाषा, गणित व पर्यावरण शाळा, सामाजिकशास्त्र या चार विभागातील ६0 प्रश्न राहणार आहे. 
दोन तासांची वेळ दिली जाणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तरावर डीएमयूची रचना करण्यात आली आहे. यामध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे. हे पथक चाचणी सुरू असताना कोणत्याही शाळेला भेट देणार आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवड
नॅशनल अचिव्हमेंट सर्वेसाठी राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील १0, चिखली ९, देऊळगाव राजा ५, जळगाव जामोद ४, खामगाव १0, लोणार ५, मलकापूर ५, मेहकर ९, मोताळा ४, नांदूरा ६, संग्रामपूर ३, शेगाव ५ व सिंदखेड राजा तालुक्यातील ५ अशा एकूण ८0 शाळांची निवड करण्यात आली आहे.

चाचणीसाठी शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षक
चाचणी घेण्यासाठी प्रत्येक शाळेत शासकीय स्तरावरून एक पर्यवेक्षक दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेचे सीलबंद पाकीटसुद्धा परीक्षेच्यावेळी शासकीय पर्यवेक्षकांसमोरच उघडायचे आहे. त्यावर पर्यवेक्षक व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. वर्गातील ३0 विद्यार्थ्यांची चाचणी होणार असली तरी त्यादिवशी १00 टक्के विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी शाळेवर टाकण्यात आली आहे. चाचणी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी निळा किंवा काळा बॉलपेनचा वापर करायचा आहे. निवडलेल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पर्यवेक्षकांकडे द्यावे लागणार आहे.

उत्तर पत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणार
चाचणी झाल्यानंतर उत्तरपत्रिकांचे सीलबंद लिफाफे राज्य स्तरावर जाणार आहेत. राज्य स्तरावर ओएमआर पद्धतीने तपासणी होऊन तालुकानिहाय निकाल एनअेएसच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निकालावरून तालुक्यांची तुलना करता येईल.  या निकालावरून कृती कार्यक्रम तयार केला जाणार आहे. 

Web Title: Buldhana district will be open to the brot of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.