शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम् सुफलाम् बुलडाणा’ अभियानाला सुरुवात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:48 IST

खामगाव:  बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील  १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा येथून या मोहिमेस प्रारंभ होईल.

ठळक मुद्दे३ मार्च रोजी बुलडाणा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील  १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा येथून या मोहिमेस प्रारंभ होईल.भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलालजी मुथ्था पुणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जैन संघटना जलक्रांतीसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील गाव तलावांचा गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्यावतीने त्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येत असून, १६ फेब्रुवारी रोजी नांदुरा येथे जैन समाजाची बैठक झाली. या बैठकीत जैन संघटनेचे बुलडाणा उपजिल्हा समन्वयक  प्रेम झांबड यांनी मार्गदर्शन केले. तसेच भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  शांतीलालजी मुथ्था  हे स्वत: कंडारी येथील तलावातील गाळ काढण्याच्या उदघाटन साठी येणार असल्याची माहिती दिली.  या बैठकीला बुलडाणा कमिटी सदस्य  अनिल राका, उमेश जैन,  तालुका समितीचे सदस्य शांतीलाल नहार, सुभाष झांबड, आनंद संचेती,  आशीष जैन,  संदीप गादीया, डॉ. राजेंद्र गोठी, स्वप्नील झांबड, तालुका समन्वयक आशीष वानखडे यांची उपस्थिती होती.

कंडारी येथील तलावाची पाहणी!गाळ काढण्यासाठी नांदुरा तालुक्यातील कंडारी येथील तलावाची पाहणी जैन समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी सरपंच विशाल पाटील, बाळकृष्ण पाटील, विष्णू पाटील आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनबुलडाणा जिल्ह्यातील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी ३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय परिवहन तथा राज्य महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी उपस्थितीत राहतील.

१२0 जेसीबी, १४ पोकलॅण्ड दाखलजिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यातील नदी, नाले तसेच तलावातील गाळ काढण्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात १२0 जेसीबी आणि १४ पोकलॅण्ड सोबतच तांत्रिक मनुष्यबळ बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा