शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

बुलडाणा जिल्ह्यात १८३५ बालके तीव्र कुपोषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:02 IST

जिल्ह्यात वयोमानानुसार वजन कमी असलेल्या बालकांची समस्या गंभीर असून या तीव्र कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ वर पोहचली आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: दुष्काळात निर्माण होणाºया वेगवेळ्या समस्यांमध्ये कुपोषणाची समस्या चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात वयोमानानुसार वजन कमी असलेल्या बालकांची समस्या गंभीर असून या तीव्र कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ वर पोहचली आहे. त्यामुळे दुष्काळात कुपोषणाची छाया गडद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कुपोषणमुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी विविध प्रयत्न होत असले तरी, जिल्ह्यात कुपोषण पाय रोऊनच बसले आहे. आता तर दुष्काळाचे संकट जिल्ह्यावर ओढावलेले असताना कुपोषाची समस्याही डोकेवर काढत आहे. जिल्हा परिषद एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार ५४९ बालकांचे सर्वेक्षण केले असता वजनाने कमी असलेल्या बालकांची समस्या समोर आली. १ लाख ३५ हजार २०० बालके हे साधारण वजनाचे मिळून आले. तर  जिल्ह्यात वयोमानानुसार कमी वजनाच्या कुपोषीत बालकांची संख्या १ हजार ८३५ आहेत. बुलडाणा तालुक्यात १५८, चिखली २१७, मेहकर २१४, लोणार १२६, सिंदखेड राजा १७८, देऊळगाव राजा ७१, मलकापूर ७३, मोताळा ८०, नांदुरा १०८, जळगाव जामोद २०१,  संग्रामपूर १५१, शेगाव ११० व खामगाव तालुक्यात १४८ कुपोषीत बालके आहेत. विशेषत: आदिवासी भागांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. दीड हजारावर बालकांचे वजन हे त्यांच्या वयाच्या प्रमाणात अत्यंत कमी असल्याने मुलांचे वजन वाढीसाठी विशेष आहार सुरू करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य