शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: सातपुड्यात ढगफुटी: जळगाव शहरासह तालुका जलमय, शेकडो घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 14:18 IST

Buldhana: शनिवारी  पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने  नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले.

- नानासाहेब कांडलकर जळगाव जामोद (बुलढाणा) -  शनिवारी  पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने  नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले. नदीकाठची हजारो हेक्टर जमिनी खरडून गेली. पूर्णा नदीला पूर आल्याने नांदुरा- जळगाव रस्ता बंद झाला आहे.

मुख्य जळगाव व जळगाव खुर्द या दोन नगरातून  वाहणाऱ्या पद्मावती नदीला प्रचंड पूर आल्याने भीमनगर, ताटीपुरा, तबिलपुरा, रुपलाल नगर, नाव्हीपुरा, तलावपुरा, माळी खेल आदी भाग हा  जलमय झाला होता. या पद्मावती नदीकाठच्या दोन्ही भागातील घरे वाहून गेली आणि यामध्ये काही जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडली. अचानक पूर आल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. फक्त आपला जीव वाचविण्या पलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

तर जळगाव तालुक्यातील आसलगाव, सुनगाव, जामोद, वडगाव पाटण, इलोरा, निंभोरा, येनगाव, वडशिंगी, धानोरा, खेर्डा खुर्द व खेर्डा बुद्रुक आदी गावांमध्ये नदी नाल्यांचे पाणी घुसले. त्यामुळे  घरांची फार मोठी हानी झाली.  काही ठिकाणी जणू जलमय स्थिती निर्माण झाली होती. तब्बल पाच तास धुवाधार अखंड  पाऊस सुरू होता.

श्रीसंत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथेही पाणी घुसले. संस्थानचे मोठे नुकसान झाले. संस्थानच्या अनेक वस्तू पुरामध्ये वाहून गेल्यात. गत पंचवीस वर्षाचा एवढा महापूर आम्ही बघितला नाही अशी प्रतिक्रिया वयस्कर नागरिकांनी दिली. शनिवारच्या अतिवृष्टीने व महापुराने तालुक्यातील एकही गाव असे राहिले नाही की जे जलमय झाले नाही. नागरिक भयभीत झाले होते. आमदार डॉ. संजय कुटे हे त्वरित सर्व गावांना भेटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत होते. त्यांनी सर्व नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एकूणच नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत संबंधितांना दिल्या जाईल असेही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस