शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणेकरांना दरारोज पाणी मिळणार -संजय गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

बुलडाणा : शहराला मागील अनेक वर्षापासून आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. खरे तर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही एवढे ...

बुलडाणा : शहराला मागील अनेक वर्षापासून आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. खरे तर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही एवढे दिवस पाण्याची वाट पहावी लागत आहे. हे पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे होत आहे. पुढील दोन महिन्यांच्या आत नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा उपलब्ध होईल असे नियोजन सुरु आहे. तसेच २२ फेबुवारी रोजी शहरातील संगम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ५२ फुटांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. त्‍या जागेचे भूमिपूजन करण्यात येईल, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.

ते शहरातील शिवनेरी चौक परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता पार पडला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या हायब्रीड एन्युटी कार्यक्रमाअंतर्गत चिंचोले चौक ते बसस्थानकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्‍याची पायाभरणी आमदार गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. शासनाच्यावतीने दोन कोटी ११ लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रमानिमित्‍त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना त्‍यांनी सांगितले, यापुढे शहरात वाॅटर पार्क, भव्य रस्ते, व्यापारसंकुल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओपन जिम, वृध्दांसाठी मनोरंजन पार्क या सह अनेक विकासाची कामे लवकरच पार पाडली जाणार आहेत. यातील बहुतांश योजना मंजूर असून काही योजना तर सुरूही आहेत. यावेळी न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये, डाॅ. शोन चिंचोले, गोपालसिंग राजपूत, दामोधर बिडवे, बाळासाहेब धूड, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, दीपक सोनुने, निशिकांत ढवळे, आदी उपस्थित होते. (वा.प्र.)