बुलडाण्यात पोळ्यानिमित्त ट्रॅक्टरची मिरवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 20:57 IST2017-08-21T20:55:32+5:302017-08-21T20:57:20+5:30
मेहकर येथे यंदा पोळ्याचा सण चक्क ट्रॅक्टर सजवून साजरा करण्यात आला.

बुलडाण्यात पोळ्यानिमित्त ट्रॅक्टरची मिरवणूक!
ठळक मुद्दे युवा सेनेचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर (जि. बुलडाणा) : अलीकडे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत असल्याने बैल पाळण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मेहकर येथे यंदा पोळ्याचा सण चक्क ट्रॅक्टर सजवून साजरा करण्यात आला. युवा सेनेच्यावतीने सोमवारी मेहकरमध्ये ट्रॅक्टर पोळा काढण्यात आला. शहरातील विश्रामगृहावरून जिजाऊ चौक, शिवाजी उद्यान, मुख्य बाजारपेठ, सावजी गल्ली, लोणार वेस येथून ट्रॅक्टर पोळा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती माधवराव जाधव, उपसभापती बबनराव तुपे यांनी शेतकºयांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.