७० हजाराचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:20 IST2017-07-29T02:19:30+5:302017-07-29T02:20:02+5:30
गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या वाहनासह ३ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल खामगाव शहर पोलिसांनी जप्त केला.

७० हजाराचा गुटखा पकडला
खामगाव : गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या वाहनासह ३ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला. खामगाव-नांदुरा रोडवरील जलंब नाक्यावर ही कारवाई सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव शहर पोलिसांनी पाळत ठेवून वाहनाची तपासणी केली असता, या वाहनात ६८ हजार ७६० रुपयांचा गुटखा आढळून आला. अैवध गुटख्यासोबतच मोबाईल आणि वाहन असा एकुण ३ लाख ७० हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याचप्रमाणे राजू श्यामराव गव्हांदे (३२) यास ताब्यात घेण्यात आले. ठाणेदार उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संजय सदांशिव, पोहेकॉ प्रकाश वसतकार, पोका सै.मुजीब, श्रीकांत देशमुख यांनीही कारवाई केली.