शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

बुलडाणा : मेहकर उपविभागातील १५७ गावांमध्ये पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:50 AM

बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची घोषणा टंचाईग्रस्त गावांमध्ये  महाराष्ट्र भूजल अधिनियम लागू

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : मेहकर तालुक्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असणार्‍या ७५ व लोणार तालुक्यातील ८२ गावांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी पाणीटंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे ५00 मीटरच्या अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही विहिरीचे खोदकाम करणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.  भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांभोवती निश्‍चित व अधिसूचित केलेल्या प्रभाव क्षेत्रात कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील अशी विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी विहीत करण्याच्या दृष्टीने विनीमय करण्यात येईल. भूजल पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होईल, अशी कोणतीही कृती कुणीही करणार नाही. या अधिनियमनातील विविध तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेकरिता संबंधित तहसीलदारांनी त्वरित अहवाल सादर करावयाचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे कायम व्यवस्थापन करण्यामध्ये आणि पाणी टंचाईच्या काळात स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ग्रामपंचायत जिल्हा प्राधिकरणास मदत करेल, असे मेहकर उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

भीषण पाणी टंचाईची दाहकता; पाणी भरताना महिला विहिरीत पडलीसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्याच्या शोधासाठी महिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोरेगाव येथे पाणी भरत असताना एक महिला विहिरीत पडली असताना तिचे चार युवकांनी प्राण वाचविले असून, उपरोक्त घटना २१ ला घडली. सिंदखेडराजा तालुक्यात १0५ गावे असून, त्यापैकी ५0 हून अधिक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गोरेगाव, उमनगाव, सावंगी भगत यासह ८ गावात टँकरने पाणी पुरवठा होत असून, ४0 हून अधिक गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. पाण्याची दाहकता एवढी भयानक आहे की पाण्यासाठी रात्र जागून प्रतीक्षा करावी लागते. तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई असून, येथे टँकरने पाणी पुरवठा केल्या जातो. दिवसातून दोन वेळा एक टँकर फेर्‍या मारते. ग्राम पंचायतसमोरील आणि मंदिरामागील विहिरीत पाणी टाकल्या जाते. २१ ला दुपारी गावात टँकर आले असता पाणी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी उसळते. ग्रामपंचायतसमोर टँकर उभे राहिले आणि विहिरीत पाणी सोडत असताना धारेखाली हंडा भरावा म्हणून महिलांची चढाओढ लागली. या धामधुमीत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद गवई यांची बहीण कौसल्याबाई इंगळे पाणी भरण्यासाठी आल्या. पाणी भरत असताना त्यांचा तोल जावून त्या विहिरीत पडल्या. लागलीच गोंधळ उडाल्याने तेथे उपस्थित सुरेश कव्हळे, अनिल मोरे, सिराज पठाण, बाळू गवई यांनी कौसल्याबाईला वाचविण्यात यश आले. जखमी कौसल्याबाईला विहिरीतून बाहेर काढून तत्काळ साखरखेर्डा येथील दवाखान्यात आणून उपचार केले. त्या महिलेचे प्राण वाचविणार्‍या युवकांचे सर्वांनी कौतुक केले. उपरोक्त घटना घडली असताना ग्रामपंचायतमध्ये सचिवासह कर्मचारी हजर होते. त्यांची पाणी वितरणाची जबाबदारी असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर अनेकांनी रोष व्यक्त केला. सावंगीभगत सारखी वितरण व्यवस्था इतर गावांनी बजावली तर गोरेगावसारखा प्रसंग निर्माण होणार नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater shortageपाणीटंचाई