शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 13:55 IST

बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

बुलडाणा : तालुक्यातील शिरपूर येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण भटकंती आता संपली असून येळगाव धरणावरील शिरपूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.शिरपुर हे सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. सदर गावाला १ लाख ४६ हजार ८८५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु गावातील उपलब्ध साधनांच्या आधारे ३ हजार ३७५ हलार लिटर पाण्याची उपलब्धता होत होती. त्यामुळे गावक-यांना कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. अ‍ॅड.जयश्री शेळके यांनी जि.प.सदस्यपदी विराजमान होताच गावाच्या पाणीसमस्येलाप्राधान्यक्रमाने हाती घेतले. प्रशासकीय स्तरावर त्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला तसेच राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेवून गावातील  पाणीसमस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.दरम्यान येळगाव धरणावरून विहिरीसहीत ४८ लक्ष रूपयांची पुरक नळयोजना मंजुर होवून ई टेंडरींग, कार्यारंभ आदेश तथा सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता होवून पाईपलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. जि.प.सदस्या अ‍ॅड.जयश्रीताई शेळके यांनी वेळोवेळी सदर कामाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले.शिरपूर पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर जि.प.सदस्य अ‍ॅड.जयरीताई शेळके यांच्याहस्ते आज सदर पाणीपुरवठा योजनेचे जलपुजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय प्रभारी कार्यकारी अभियंता राजपूत, शाखा अभियंता मराठे, सरपंच पती विजय हिवाळे, उपसरपंच पती दिपक सुसर, ग्रा.पं.सदस्य सुभाष शेळके, ग्रा.पं.सदस्य शोभा शेळके, नंदू राजपूत, प्रदिप पाटील, केसरबाईशेळके, शारदा शेळके, अलिवर पठाण, विजय चवंड, शरद सुसर, हरिष सुसर, नितीन सुसर, प्रमोद लेंभे, अमोल सुसर, विजय सुसर, अमोल सुसर, जितु गव्हाणे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र