बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:34 AM2021-02-21T11:34:20+5:302021-02-21T11:34:39+5:30

Buldhana News मास्क न लावणाऱ्यांना तथा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत.

Buldana Municipality begins punishment those who not wear masks | बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका

बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी बुलडाणा पालिकेने विनामास्क फिरणाऱ्या तथा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करून अवाजवी गर्दी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यानुषंगाने बुलडाणा शहरात पाच पथके गठित करण्यात आली आहे. स्टेट बँक चौक, चिखली रोडसह शहरातील विविध भागात फिरून ही पथके मास्क न लावणाऱ्यांना तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. दरम्यान पालिकेच्या या धडक कारवाई मोहिमेमुळे घरात अडगळीत गेलेले अनेकांचे मास्क आता पुन्हा तोंडावर आले आहेत. तसेच नागरिकही शारीरिक अंतराचे योग्य पद्धतीने पालन करत असल्याचे चित्र तूर्तास तरी आहे. बाजारपेठेमध्येही तुलनेने गर्दी कमी झाली आहे. बुलडाणा पालिकने १८ फेब्रुवारी पासूनच पथके गठित करून कारवाई सुरू केली आहे. स्वत: जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती व पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी शहरातील विविध भागात प्रत्यक्ष पाहणी करून ही पथके योग्य पद्धतीने काम करत आहेत का नाही, याची चाचपणी केली होती. त्यानुषंगाने ही पथकेही अधिक सक्रिय झाली आहेत.  प्रकाश केसकर, शुभम मेश्राम, गजानन बदरखे, आशिष फोकाटे, राजेश भालेराव हे प्रमुख असलेल्या या पथकात प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
पाचही पथकांना त्यांचा परिसर ठरवून दिलेला आहे. पहिले पथक मलकापूर रोड, डॉल्फिन स्विमिंग पूल ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक मुख्यालय,  दुसऱ्याकडे जांभरून रोड, बस स्टँड परिसर ते संगम चौक, तिसऱ्या पथकाकडे चिखली रोड, बोथा खामगाव रोड ,  त्रिशरण चौक, चौथ्या पथकाकडे चिंचोले चौक, धाड रोड, नाका ते सर्क्युलर रोड आणि अतिक्रमण पथकाकडे जनता चौक, बाजारपेठ, मार्केट लाईन ते कारंजा चौक असा भाग देण्यात आला आहे. प्रसाशन अधिकारी संजय जाधव  व  एकनाथ गोरे यांच्यावर या पथकांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


साडेसात लाखांचा दंड वसूल
बुलडाणा शहरात गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत बुलडाणा पालिकेने सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात मास्क न लावल्याप्रकरणी २ लाख ९ हजार रुपये, वेळेनंतर दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी एक लाख रुपये, रस्त्यावर तथा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी १ लाख ५७ हजार रुपये, शारीरिक अंतराचे पालन न केल्या प्रकरणी १ लाख २६ हजार आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.

Web Title: Buldana Municipality begins punishment those who not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.