शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

बुलडाणा:  खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:17 IST

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सातत्याने अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाने सतावल्याचे स्पष्ट होत असून जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही अवघी ४३ पैसे आली आहे. ५० पैशाच्या आत ती असल्याने शेतकºयांच्या आणखी काही नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.चालू दशकात २०१३-१४ या वर्षाचा अपवाद वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षणाची स्थिती आहे. त्यात यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. मात्र परतीचा व अवकाळी पावसामुळे चांगले उत्पादन होण्याच्या पल्लवीत झालेल्या शेतकºयाच्या आशेवर पाणी फेरले होते. जिल्ह्यातील सहा लाख ४९ हजार ३५१ शेतकºयांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात या पावसामुळे ५५९ कोटी ६४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांना त्वरनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. दरम्यान राज्य शासनाने यापैकी १३६ कोटी १३ लाख रुपये पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला दिले होते. त्याच्या वाटपानंतर जिल्ह्याला दुसºया टप्प्यात जिल्ह्याला २९७.४८ कोटी रुपये मिळाले होते. त्याची सध्या तालुकास्तरावरून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्यापही जिल्ह्याला १२६ कोटी रुपयांची प्रतीक्षा आहे.अशातच जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या नव्या निकषामुळे यात काही प्रसंगी काही अडचणीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर झाली होती. ती त्यावेळी ७२ पैसे आली होती. मात्र त्यानंतर आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. त्यातच ३१ आॅक्टोबरला जाहीर झालेली सुधारीत पैसेवारी ही ६९ पैसे आली होती. खरीपामध्ये जिल्ह्यात यावर्षी सात लाख ३९ हजार ८६७ हेक्टरवर पेरा झाला होता. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आलेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे हातोंडाशी आलेले पिक हातून गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी