शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

बुलडाणा पाटबंधारे विभाग ठरतोय ‘स्वच्छता दूत’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:52 IST

बुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे.

ठळक मुद्देसुटीच्या दिवशी स्वच्छता अभिलेख अद्ययावत ठेवण्याचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाने सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्याचा नवा पायंडा निर्माण केल्याने इतर शासकीय विभागासाठी येथील पाटबंधारे विभाग ‘स्वच्छता दूत’ ठरत आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सुटीचा सदुपयोग पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी केला असून, स्वच्छतेबरोबरच कार्यालयातील अभिलेख व्यवस्थित लावणे व प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याचा  विशेष उपक्रम राबविला. स्वच्छता अभियान राबविण्यासाठी  शासन स्तरावरून युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. या अभियानामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचासुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला जातो. स्वच्छता अभियानाविषयी जागृती निर्माण करण्याचे काम शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांकडून केले जाते; मात्र इतरांना स्वच्छतेचा उपदेश देणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचेच कार्यालय नेहमी अस्वच्छ पाहावयास मिळते. अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात; परंतु येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याला अपवाद ठरले आहेत. लहान, मोठय़ा व मध्यम अशा एकूण १0५ प्रकल्पांचे सिंचन व्यवस्थापनाचे काम पाहणार्‍या पाटबंधारे विभागातील ३५ अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटीच्या दिवशी स्वच्छतेचा नवा उपक्रम हाती घेतला. अकोला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुश देसाई व कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभाग बुलडाणाच्या उपकार्यकारी अभियंता क्षितिजा गायकवाड व सहायक कर्मचार्‍यांनी  शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या सुटीचा सदुपयोग म्हणून स्वच्छता अभियान हाती घेतले. तसेच स्वच्छतेबरोबरच कार्यालयातील अभिलेखाचे अद्ययावतीकरण करणे यासारखे विविध उपक्रमही राबविले. बुलडाणा पाटबंधारे विभागाचा हा उपक्रम इतर विभागासाठी  आदर्श ठरत आहे.  

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सी