बुलडाणा : हतेडी येथे आग लागून चार घरांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:31 AM2018-02-25T00:31:48+5:302018-02-25T00:31:48+5:30

बुलडाणा : नजीकच्या हतेडी बु. येथील चार ते पाच घरांना अचानक आग लागली, तर एक भुशाचे कोठार खाक झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. या  आगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी उषा इंगळे यांनी दिली. 

Buldana: hatedi four home damage by fire | बुलडाणा : हतेडी येथे आग लागून चार घरांचे नुकसान 

बुलडाणा : हतेडी येथे आग लागून चार घरांचे नुकसान 

Next
ठळक मुद्दे२४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली घटनाआगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नजीकच्या हतेडी बु. येथील चार ते पाच घरांना अचानक आग लागली, तर एक भुशाचे कोठार खाक झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. या  आगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी उषा इंगळे यांनी दिली. 
 प्राप्त माहितीनुसार, जि. प. शाळेला लागून असलेल्या वस्तीत कुणीतरी शेकोटी पेटविली होती. वार्‍यामुळे अर्धवट विझविलेल्या शेकोटीतील विस्तव उडाल्याने कलाबाई पवार, प्रभाकर जाधव, भानुदास निकाळजे, नीलेश जाधव यांच्या घरासमोरील ओसर्‍यांना आग लागली. घरातील कपडे, इलेक्ट्रिक मीटर, लाकडी सामान, टिनपत्रे जळाले. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. त्यामुळे लवकर आगीवर नियंत्रण मिळविता आले; मात्र रमेश जाधव यांचे भुशाचे कोठार पूर्णपणे जळून खाक झाले. तलाठी उषा इंगळे, ग्रामसेवक एन. बी. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी सरपंच सुनंदा झिने, सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुने, बिट जमादार कोर्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Buldana: hatedi four home damage by fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.