शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा निवडणूक 2019 : जळगाव जामोद तालुक्यात नागरिकांचा मतदानासाठी उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 13:34 IST

कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी कुटूंबियासह मतदान केले.

जळगाव जामोद: रविवारी सकाळी जळगाव जामोद तालुक्यात दमदार पाऊस झाला. याही परिस्थितीत नागरिकामध्ये मतदानासाठी उ्त्साह दिसून येत होता. महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी कुटूंबियासह मतदान केले. याशिवाय काँग्रेस उमेदवार डॉ. स्वातीताई वाकेकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, जळगावच्या नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारही उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळी सात वाजता मतदानाला सर्वत्र शांततेत सुरुवात झाली पाऊस पडत असल्याने मतदान धीम्या पद्धतीने असले तरी उत्साहाने होत आहे.  तरुण वयोवृद्ध दिव्यांग तथा महिला मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रे आद्यवत असून अधिकारी व कर्मचारी आपापली कर्तव्य बजावत आहेत. या विधानसभा मतदार संघात ३१५ ातदान केंद्रासाठी तब्बल चौदाशे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त असून स्वयंसेवक दिव्यांग राम मतदारांची ने-आण करीत आहेत. जळगाव शहरात महिलांसाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. हे मतदान केंद्र निवडणुकीचे आकर्षण ठरत आहे. या दरम्यान मतदान केंद्रांवर बाल संगोपनासाठी महिला, वैद्यकीय कीट साठी महिला आणि बी एल ओ तैनात आहेत.

९० वर्षीय वृद्धाचे मतदान जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील मतदान केंद्रावर आज सकाळी नऊ वाजता रेणुकादास ईटणारे या ९० वर्षीय वयोवृद्ध इसमाने मतदान केले. त्यांना व्हीलचेअरवरून मतदान केंद्रात स्वयंसेवकांनी नेले.  दत्तात्रय सुपडा वेरुळकर या दिव्यांग मतदाराने यावेळी मतदान केले. या मतदारांना दे कमालीचा उत्साह दिसून आला. मतदान हा राष्ट्रीय उत्सव असून आम्ही उत्साहाने मतदान करीत असल्याचे यावेळी मतदारांनी सांगितले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jalgaon Jamodजळगाव जामोद