बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:38 PM2019-11-11T14:38:50+5:302019-11-11T14:38:56+5:30

कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.

In Buldana district, sowing of rabbis will be done on 2.5 lakh hectares | बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पेरा जाणार अडीच लाख हेक्टरवर

googlenewsNext

- योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जवळपास महिनाभर मुक्काम ठोकून बसलेल्या परतीच्या पावसामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झालेला आहे. हा ओलावा रब्बी पिकांसाठी पोषक आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत रब्बी हंगामातील पिकांचा पेरा दुपटीने वाढणार असून अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हा पेरा होणार आहे. कृषी विभागाने त्या दृष्टीने नियोजनास प्रारंभ केला आहे.
गतवर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. ऐन सोयाबीनला शेंगा लागण्याच्या कालावधीतच पावसाने दांडी मारल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. कापसासह सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसला. खरीपप्रमाणेच रब्बी हंगामावरही दुष्काळी परिस्थितीचा परिणाम झाला. सिंचनाची पुरेशी व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड करण्याचे टाळले. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षी केवळ १ लाख २८ हजार, ६९८ हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये गहू १५ हजार ५५४, मका २ हजार ५१७, ज्वारी ८ हजार ४३४, हरभरा १ लाख २ हजार १३० तर ६३ हेक्टर क्षेत्रावर करडीची पेरणी झाली होती. यावर्षी कृषी विभागाच्या वतीने सुरूवातीला १ लाख ५७ हजार ७३ हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र परतीच्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर गेल्याने सुधारीत नियोजन करण्यात आले आहे. यानुसार रब्बीचे प्रस्तावित क्षेत्र २ लाख ४२ हजार ८१६ हेक्टर आहे. दमदार पावसामुळे जमिनीमध्ये चांगला ओलावा असल्याने सिंचनाची व्यवस्था नसलेले शेतकरी देखील रब्बी पिकांची लागवड करणार आहेत. यामुळे आधीच्या नियोजनाच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात जवळपास १ लाख हेक्टरने वाढ होणार असल्याचे चित्र आहे. प्रसंगी त्यापेक्षाही अधिक क्षेत्रावर रब्बीचा पेरा होईल, असे संकेत आहेत. दरम्यान यावर्षी रब्बी ज्वारी १२ हजार ५००, गहू ६६ हजार ५७५, हरभरा १ लाख १२ हजार ६४१, मका ३२ हजार, सुर्यफुल १००, करडई एक हजार तर १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मका चारा पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामासाठी एकुण ८१ हजार ५७५.५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक २० हजार ७५३ तर खासगी ६० हजार ८२२.५ क्विंटलचा समावेश आहे. आतापर्यंत ३९ हजार ७६७ क्विंटलचे आवंटन देण्यात आले आहे. यापैकी प्रत्यक्षात ८ हजार ६७८.४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.

करडई व सुर्यफुलाचे सर्वात कमी क्षेत्र
जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच १ लाख १२ हजार ६४१ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यापाठोपाठ गव्हाच्या पिकाला शेतकरी पसंती दर्शवित आहेत. सूर्यफुलाकडे मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. सुर्यफुल पिकाची केवळ १०० हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार आहे. करडई या पिकाला देखील शेतकºयांनी कमीच महत्त्व दिले आहे. जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर या पिकाच्या लागवडीचे नियोजन आहे. यावरून करडई व सुर्यफुल या पिकाचे क्षेत्र सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.


वाढीव क्षेत्रानुसार बियाण्यांचे नियोजन करण्याचे निर्देश
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामातील क्षेत्रात दुपटीने वाढ होणार आहे. यामुळे बियाण्याची गरजदेखील वाढली आहे. शेतकºयांना लागवडीसाठी बियाणे कमी पडणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी बुलडाण्यात कृषी विभागाच्या अधिकाºयांना दिले आहेत.

Web Title: In Buldana district, sowing of rabbis will be done on 2.5 lakh hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.