बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस, वीज पडून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 16:01 IST2021-02-18T16:01:21+5:302021-02-18T16:01:29+5:30
Buldhana News तांदुळवाडी येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस, वीज पडून एक ठार
बुलडाणा: जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून बुलडाणा शहरा नजीक असलेल्या तांदुळवाडी येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा वीज अंगावर पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच सकाळी ११ वाजेच्या सुमारास बुलडाणा तालुक्यासह परिसरात पावसाने हजेरी लावली जवळपास तासभर हा अवकाळ पाऊस पडत होता. याच गाळात वीजांचाही गडगडाट मोठ्या प्रमाणावर होता. त्यातच तांदुळवाडी येथील एका वृद्धाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली. सध्याही जिल्ह्यातील काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. प्रामुख्याने जिल्हामुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरासह तालुक्यात या पावसाचा जोर अधिक असल्याचे सध्याचे चित्र आहे.