बुलडाणा जिल्ह्यात ४१६ पॉझिटिव्ह, १३६ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:13 IST2021-02-24T11:13:19+5:302021-02-24T11:13:23+5:30
coronavirus news २३ फेब्रुवारी रोजी तब्बल ४१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात ४१६ पॉझिटिव्ह, १३६ जणांची कोरोनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून २३ फेब्रुवारी रोजी तब्बल ४१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संक्रमणाची व्याप्ती वाढल्याचे चित्र आहे. सुदैवाने मंगळवारी एकाचाही मृत्यू झाला नाही.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी २,०४९ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ४१६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
यात झाडेगाव येथील १४१, आसलगाव ६, मोताळा ३, मूर्ती ४, थड २, सिंदखेड २, बुलडाणा ६२, पिंपळगाव सराई १, सागवन ४, जानोरी ७, शेगाव ३१, खामगाव ७, पळसखेड दौलत ५, कव्हाळा ३, चिखली २३, दे. राजा २२, सिनगाव जहाँगीर ५, डोढ्रा २, दे. मही ५, येवती ६, नांद्रा ३, तांबोळा १, सुलतानपूर ३, वेणी १, लोणार १७, नांदुरा १, मलकापूर १, सिं. राजा ४, किनगाव राजा १, सोनाळा १, बावनबीर १, वरवट बकाल १ व अन्य काही गावांसह बीड जिल्ह्यातील २, अैारंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील १, जालन्यातील संजोळ येथील १, अमरावती येथील सौरभ कॉलनीमधील १ याप्रमाणे ४१६ जणांचा समावेश आहे.