बुलडाणा :  स्थलांतरितांना समुपदेशनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:48 AM2020-04-26T11:48:23+5:302020-04-26T11:48:27+5:30

या कालावधीत नियमित योगा, समुपदेशनामुळे त्यांचा 'क्वॉरंटीन'काळ तणावमुक्त पूर्ण झाला.

Buldana: Counseling Lessons for Immigrants | बुलडाणा :  स्थलांतरितांना समुपदेशनाचे धडे

बुलडाणा :  स्थलांतरितांना समुपदेशनाचे धडे

Next

- सोहम घाडगे 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लॉकडाउनमध्ये महानगरांमधून गावी परतणाऱ्या ४२ परप्रांतीयांची स्थानिक शाळा क्र. २ मधील निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली होती. या कालावधीत नियमित योगा, समुपदेशनामुळे त्यांचा 'क्वॉरंटीन'काळ तणावमुक्त पूर्ण झाला. प्रशासनाने स्वतंत्र वाहनाद्वारे त्यांना घरी पोहोचविले.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधानांनी देशात लॉकडाउन घोषित केले. त्यामुळे महानगरातून मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरु झाले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने जमेल तशा पद्धतीने नागरिकांनी गाव जवळ करण्याचा प्रयत्न केला. अनेक जण पायी निघाले. कोराना संसर्ग थांबविण्यासाठी, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य, जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्यामुळे स्थलांतराचा प्रयत्न करणाऱ्यांना सीमेवर अडविण्यात आले. त्यांची वैद्यकिय तपासणी करुन त्यांची रवानगी तात्पुरत्या निवारा केंद्रात करण्यात आली.
लॉकडाउन जाहीर होताच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या आदेशानुसार नगर पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पालिका शाळा क्र. २ मध्ये ३४ जणांची जवेणाची व राहण्याची व्यवस्था केली. दरम्यान ३१ मार्च रोजी बारामतीवरुन पायी निघालेल्या १३ व्यक्तिंची याठिकाणी व्यवस्था करण्यात आली. तसेच २ एप्रिल रोजी बंगळूरुवरुन उत्तरप्रदेशला कंटेनरमधून निघालेल्या २९ जणांची आरोग्य तपासणी करुन चहा, नाश्ताची व्यवस्था केली. नंतर तहसीलच्या मदतीने त्यांची दुसºया वसतीगृहात रवानगी केली. निवारा केंद्राला आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा नजमुन्निसा मो. सज्जाद यांनी भेटी देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार विद्या गौर, स्वप्नील लहाने, अशोक शेळके, गणेश देशमुख, सुनील बेंडवाल, अब्दूल रियाज अब्दूल समद, महेंद्र सौभागे, अमोल इंगळे, योगेश कुंदनगार यांनी जबाबदारी पार पाडली. सतीश उबाळे, नीलेश घोंगडे, सुभाष मोरे, फकिरा खिल्लारे, बाळू मोरे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाºयांनी मदत केली.

 

Web Title: Buldana: Counseling Lessons for Immigrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.