बुलडाणा झाले भगवेमय, शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST2021-02-20T05:39:08+5:302021-02-20T05:39:08+5:30

स्थानिक मिल्ट्री प्लॉट येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बुलडाणा विभागाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ज्येष्ठ माजी सैनिक ...

Buldana became saffron, Shiva Jayanti was celebrated with enthusiasm | बुलडाणा झाले भगवेमय, शिवजयंती उत्साहात साजरी

बुलडाणा झाले भगवेमय, शिवजयंती उत्साहात साजरी

स्थानिक मिल्ट्री प्लॉट येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बुलडाणा विभागाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ज्येष्ठ माजी सैनिक अशोक कऱ्हाळे, समाजसेविका गुलगुले, अनिल बावस्कर यांच्या हस्ते शिवरायांचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर महिला मंडळाने पाळणा म्हटला. इतिहासकार जगदीशचंद्र पाटील, शंकर थुट्टे, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख साग चव्हाण यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. रितिका कानडजे या चिमुकलीने मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष सोनुने, अंबादास चव्हाण, अंकेश मुठ्ठे, विशाल ढवळे, सुनील मते, शुभम मावळे, तुषार गाडेकर, गजानन भुरे, शिवाजी गाडेकर, सुनील कानडजे, संतोष मुळवंडे, आशिष दुबे व समस्त मिल्ट्री प्लॉट येथील महिला व पुरुष मंडळी व धारकरी उपस्थित होते. प्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. विशेष म्हणजे सर्व कार्यक्रम कोरोनासंबंधीचे नियम पालन करून साजरे घरण्यात आले. या कार्यक्रमाकरिता मंडप व्यवस्था दादाराव शिंदे यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

Web Title: Buldana became saffron, Shiva Jayanti was celebrated with enthusiasm