शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: ६.३४ लाख शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:48 IST

नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामादरम्यान ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे जिल्ह्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सामान्य जमीन महसूल जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी चार फेब्रुवारी रोजी काढलेल्या एका आदेशानुसार सुट देण्यात आली आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पाल्यांचे शालेय तथा महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्कही माफ करण्याबाबत त्वरेने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केल आहे.बुलडाणा जिल्ह्यात यंदा बºयात वर्षानंतर चांगला व वेळेत पाऊस आला होता. त्यामुळे खरीपाचे पीक ही चांगले येण्याचे संकेत मिळाले होते. मात्र आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’ चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणावर परतीचा व अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांच्या हाती आलेले सोयाबीनसह अन्य धान्य खराब झाले तर जवळास पाच कोटी रुपये मुल्याच्या सोयाबीनच्या सुड्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सहा लाख ३४ हजार ७९ शेतकºयांचे नुकसान झाले होते. खरीपाचा हंगामाच शेतकºयांच्या हातून निघून गेला होता. या पावसाचा कहर म्हणजे नजर अंदाजमध्ये पैसेवारी ही जवळपास ७० च्या आसपास असताना अंतिम पैसेवारी मात्र ५० पैशाच्या आत आली होती. त्यामुळे या पावसाच्या कहराची कल्पना यावी. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यात मोठी ओरड झाली होती. सोबतच राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली होती. त्या पार्श्व भूमीवर महसू व वन विभागाच्या सुचनांच्या आधारावर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी चार फेब्रुवारी रोजी आपद्ग्रस्त शेतकºयांना दिलासा म्हणून काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये जमीन महसूलात सुट देणे व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भाने सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागाने करावा तथा त्यासाठी आवयक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असेही या आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी