ग्राहक मंचची इमारत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 28, 2014 23:59 IST2014-11-28T23:59:09+5:302014-11-28T23:59:09+5:30
बुलडाणा येथील ग्राहक मंचच्या इमारतीची१६ वर्षांपासून दुरुस्ती नाही.

ग्राहक मंचची इमारत ‘न्याया’च्या प्रतीक्षेत
सिद्धार्थ आराख/बुलडाणा
भिंतीला ठिकठिकाणी गेलेले तडे, तुटलेल्या फरशा, प्लॅस्टरचे गळलेले तुकडे, खिडक्यांचे तुटलेले तावदाणे अशा आवस्थेत मागील १६ वर्षापासून येथील ग्राहक न्यायमंचची ईमारत आलेल्या सर्व ग्राहकांना न्याय दाणाचे काम करीत आहे. मात्र या ईमार तीला कोण न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याच्या कल्याण सल्लागार समि तीचे अध्यक्ष सुर्यकांत गवळी (मंत्रीस्तरीय दर्जा) हे बुलडाणा येथे येत असून या ईमारतीच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे.
बसस्थानकासमोरील प्रशासकिय इमारतीच्या आवारात जिल्हा न्याय मंचाची ईमारत आहे. दिसायला बाहेरून टुमदार असलेली ही ईमारत आतून मात्र तीची दयनीय आवस्था झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते मोठय़ा दिमाखात या ईमारतीचे उद्घाटन झाले. या ईमारतीमध्ये प्रवेश करताच येथे कर्मचारी कसे काम करतात हे दिसून येते. ईमार तीमध्ये न्यायदानाचा एक हॉल व इतर चार अशा आठ खोल्या आहेत. कोणत्याही खोलीत प्रवेश करा खोलीतील टाईल्स कुठे दबलेल्या तर कुठे वर आलेल्या दिसतात. खिडक्याचे तावदाणे फुटलेले आहेत. इमारतीच्या भिंतीना मोठ मोठे तडे गेलेले आहेत. ठिकठिकाणी छ ताचे प्लॅस्टर गळाल्याने पावसाळ्यात सर्वच खोल्या गळतात. त्यामुळे पावसाळ्यात महत्वाचे रेकॉर्ड ओले होते. ईमारत बांधून तब्बल १६ वर्षे झाले या सोळा वर्षात ईमारतीची कोणतीही डागडूजी करण्यात आली नाही. रंगरंगोटी तर कोठेही दिसत नाही. ईमारतीला तडे गेल्याने इमारत कोसळणार तर नाही ना या भितीने कर्मचारी जीव मुठीत ठेवून काम करतात. तेव्हा आता तरी या ईमारतीचे भाग्य उजळेल अशी अपेक्षा कर्मचार्यांना आहे.