म्हैस, गोठा आगीत खाक
By Admin | Updated: April 12, 2017 00:42 IST2017-04-12T00:42:44+5:302017-04-12T00:42:44+5:30
वरोडी : येथील शेतकरी यादव गारोळे यांच्या गोठ्याला ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अचानकपणे आग लागली.

म्हैस, गोठा आगीत खाक
वरोडी : येथील शेतकरी यादव गारोळे यांच्या गोठ्याला ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अचानकपणे आग लागली. त्या आगीत गोठ्यात बांधलेली म्हैस व नुकतीच घेतलेली मोटारसायकल आणि सोयाबीनचे कुटार जळून खाक झाले. यामध्ये जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अल्पभूधारक शेतकरी यादवराव गारोळे यांनी जोडधंदा करावा म्हणून नातेवाइकांकडून पैसे उसणे घेऊन दुधाचा व्यवसाय करण्यासाठी नुकतीच ४० हजार रुपयांची म्हैस विकत घेतली व दूध डेअरीवर दूध नेण्यासाठी मुलाला मोटारसायकल घेऊन दिली. दरम्यान, ११ एप्रिल रोजी गोठ्याला अचानक आग लागून यामध्ये सोयाबीन कुटार व मोटार सायकलने पेट घेऊन पेट्रोल टाकीचा स्पोट झाला. त्यामुळे आग वेगात फैलून गोठ्यात बांधलेली म्हैससुद्धा जळून मृत्युमुखी पडली. यामध्ये यादवराव गारोळे या गरीब शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गावातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.