अर्थसंकल्प प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:04+5:302021-02-05T08:36:04+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे बंद पडून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासह प्रामुख्याने बेरोजगारांच्या हाताला काम ...

अर्थसंकल्प प्रतिक्रिया
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे बंद पडून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासह प्रामुख्याने बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल शेतीला उत्तम दिवस कसे येतील यावर या अर्थसंकल्पात प्रामुख्याने भर दिला गेला आहे. ही बाब समाधानकारक आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आज सादर झालेला अर्थसंकल्प ठीक आहे, असे म्हणावे लागेल, अशा शब्दात माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी अर्थसंकल्पाबाबत भाष्य केले आहे.
शेतकरी हिताचा अर्थसंकल्प : आ. श्वेता महाले
चिखली : शेतकऱ्यांना उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात दिले आहे. सोबतच गहू, भात, डाळी यांच्या खरेदीसाठी काँग्रेस सरकारच्या तुलनेत दुप्पट निधीची तरतूद तर केलीच आहे. त्याच वेळी पीक कजार्साठी तब्बल १६.५० लाख कोटींची तरतूद करून शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत, हा संदेश या अर्थसंकल्पात दिला असून हा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात जास्त शेतकरी हिताचा अर्थसंकल्प असल्याचे मत आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केले आहे.
सर्वांचे अर्थकारण ‘ऑफलाईन’ करणारा बजेट’ : राहुल बोंद्रे
चिखली : कोविड - १९ मुळे ढासळलेली अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी आम जनतेच्या शिखात पैसा जाऊन बजेटला सावरण्याचे काम व्हायला हवे होते. मात्र, आम जनतेच्या खिशातून पैसा काढून तो मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी आम जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आणि सर्वांचेचे बजेट ‘ऑफलाईन’ करणारे हे ‘ऑनलाईन’ बजेट असल्याची घणाघाती टीका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.