उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:35 IST2021-08-15T04:35:30+5:302021-08-15T04:35:30+5:30

संदीप वानखडे बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्वला याेजना ...

Bright again on the stove; Connection free, but how to fill the gas? | उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

संदीप वानखडे

बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्वला याेजना सुरू केली आहे़ या याेजनेंतर्गंत गॅस कनेक्शन माेफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामांन्याना परवडत नसल्याचे चित्र आहे़ सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करत चूल पेटवावी लागत आहे़ आधीच महागाई वाढत असल्याने त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे़ सध्या सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत असून सबसिडी बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे़

गत काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत़ त्यामुळे, सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे़ आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहे़ त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे़

मीना विजय खरात, गृहिणी

सिलिंडरचे भाव ९०० रुपयांपर्यंत पाेहोचले आहे़ दुसरीकडे सबसिडी मात्र तीन ते चार रुपये मिळत आहे़ त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावे़ तसेच सबसिडी वाढविण्याची गरज आहे.

साेनाली वैभव मगर, गृहिणी

काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत़ त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियाेजन बिघडले आहे़ गॅसचे भावही दुप्पटीने वाढले असून मिळणारी सबसिडी बंदच झाली आहे़ त्यामुळे, सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे़

साेनू गणेश जुनघरे, गृहिणी

Web Title: Bright again on the stove; Connection free, but how to fill the gas?