वीट उत्पादक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:27+5:302021-04-20T04:36:27+5:30
धोकादायक रस्ता देऊळगाव राजा: पुणे - नागपूर राष्ट्रीय मार्गावरील दगडवाडी ते असोला जहागीर फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता ...

वीट उत्पादक अडचणीत
धोकादायक रस्ता
देऊळगाव राजा: पुणे - नागपूर राष्ट्रीय मार्गावरील दगडवाडी ते असोला जहागीर फाटा हा दोन किलोमीटरचा रस्ता वाहनधारकांना अतिशय धोकादायक बनला आहे. रखडलेले रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची गरज आहे.
मशागत खर्च वाढला
बुलडाणा : डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरमालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी शेती मशागत चांगलीच खर्चिक बनली असल्याचे दिसून येते.
रस्त्यांची दुरवस्था
दुसरबीड : सिंदखेडराजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर माेठ-माेठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करण्यात येत आहे.
विद्युत देयक भरण्याचे महावितरणचे आवाहन
देऊळगाव राजा: महावितरणच्या देऊळगाव राजा उपविभागामध्ये एकूण ३६ हजार ग्राहक आहेत. यामध्ये कृषिपंपधारक १६ हजार ग्राहक आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्राहकांची संख्या ४०० असून, घरगुती वीजग्राहक १६ हजार ५००, तर वाणिज्य ग्राहकांची संख्या दोन हजारांवर आहे. यामध्ये शासकीय-निमशासकीय कार्यालयांची संख्या १४५ असून, यांच्याकडे सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आहे. विद्युत ग्राहकांनी थकीत देयके भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.